थर्टी फर्स्टच्या रात्री ऑनलाईन फूड डिलिव्हरीची वेळ रात्री दीडपर्यंत

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

३१ डिसेंबरच्या रात्री मुंबईत फूड डिलिव्हरी आणि हॉटेल्समधील पार्सलची सुविधा आता रात्री दीडपर्यंत सुरु राहणार आहे. मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.  डियन हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनने पालिकेला याबाबत विनंती केली होती. 

मुंबईत ५ जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लागू आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टाँरंट आणि बार रात्री ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, नववर्षाच्या स्वागतासाठी लोकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन लोकांच्या सुविधेसाठी हॉटेल्सची किचन आणि होम डिलेव्हरी रात्री दीडपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे नाईट कर्फ्यूच्या निर्णयामुळे नाराज असलेल्या हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. 

मुंबई महानगरपालिकेच्या या निर्णयाबद्दल ‘आहार’चे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी  म्हटलं की, पालिकेच्या या निर्णयावर आम्ही खुश आहोत. आम्ही आमच्या सदस्यांना रात्रीच्या कर्फ्यू दरम्यान आमच्या ऑपरेशन्सवर नियंत्रण ठेवत असलेल्या सर्व नियम आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगू. फक्त आमची विनंती आहे, की जे लोक आपले पैसे घेऊन घरी येतील त्यांना आणि होम डिलिव्हरीमध्ये सामील झालेल्या कर्मचार्‍यांना त्रास होऊ नये.


हेही वाचा -

जानेवारी ते नोव्हेंबर २०२० पर्यंत रेल्वेच्या हद्दीत ३५ हजार गुन्ह्यांची नोंद

सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शन क्षमतेत वाढ


पुढील बातमी
इतर बातम्या