Advertisement

सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शन क्षमतेत वाढ

प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराची दर्शनक्षमता वाढवण्यात येणार आहे.

सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शन क्षमतेत वाढ
SHARES

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तब्बल ७ ते ८ महिने बंद असलेली मंदिर पाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा उघडण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मोजक्याच भक्तांना दर्शनासाठी प्रवेश देण्याचा निर्णय सुरूवातीला घेण्यात आला होता. मात्र, आता २०२० हे वर्ष संपत असून शुक्रवार पासून २०२१ नव्या वर्षाची सुरूवात होणार आहे. त्यामुळं या नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी जास्तीत जास्त भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराची दर्शनक्षमता वाढवण्यात येणार आहे.

सिद्धिविनायक मंदिरात दर तासाला २५० भाविकांना दर्शन घेता येत आहे. आता १ जानेवारीला दर तासाला ८०० जणांना दर्शन घेता येणार आहे. ज्या भाविकांनी ऑनलाइन सांकेतिक चिन्ह (क्यूआर कोड) आरक्षित केलं आहे, त्यांनाच एस. के. बोले मार्गावरील सिद्धी प्रवेशद्वार व काकासाहेब गाडगीळ मार्गावरील रिद्धी प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाणार आहे.

ज्या भक्तांनी सांकेतिक चिन्ह आरक्षित केलेले नाही त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. आरक्षणाचे सांकेतिक चिन्ह अहस्तांतरणीय असून, ते व्हॉट्सअ‍ॅपद्वारे, छायाप्रत किंवा स्क्रीनशॉटच्या स्वरूपात स्वीकारलं जाणार नाही. ज्या भाविकांनी सांकेतिक चिन्ह आरक्षित केलं आहे. परंतु, दर्शनासाठी येणं शक्य नाही त्यांनी आरक्षण रद्द करावं, अशी सूचना मंदिर प्रशासनानं केली आहे.

दर्शनाच्या वेळा

  • सकाळी ७ ते दुपारी १२
  • दुपारी १२.३० ते संध्याकाळी. ७
  • रात्री ८ ते ९.
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा