१२-१४ वयोगटातील मुलांचे लसीकरण आता शाळेत होणार

(Representational Image)
(Representational Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बृहन्मुंबई महानगरपालिके(BMC)नं १२-१४ वयोगटातील मुलांसाठी शाळेत कोविड-१९ लसीकरण मोहीम सुरू केली आहे. यासाठी पालिकेनं प्रोजेक्ट मुंबई सह हातमिळवणी केली आहे. “At your door step” असं या उपक्रमाचा हा उपक्रम आहे.

या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना highschoolvaccination@gmail.com वर ईमेल पाठवावा लागेल.

यासह, लसीकरण मोहीम शाळेतील लाभार्थ्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्यात आली आहे. शाळेच्या संचालक किंवा मुख्याध्यापकांकडून एक विनंती पत्र पाठवले जावे ज्यात लाभार्थ्यांची अंदाजे संख्या नमूद केली असेल.

शिवाय, शाळांमध्ये राबवण्यात येत असलेल्या कोरोनाव्हायरस लसीकरण मोहिमेबाबत शाळा प्रशासनानं पालकांना माहिती द्यावी. यामुळे पालक आपल्या मुलांना निर्धारित तारखेला लस घेण्यासाठी शाळेत पाठवू शकतील.

एनजीओ संपूर्ण COVID-19 लसीकरण प्रक्रिया सुलभ करेल. पालिका हे लसीकरण मोफत करणार आहे.

भारताने १६ मार्चपासून १२-१४ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची मोहीम सुरू केली. या वयोगटासाठी, कॉर्बेवॅक्स ही लस दिली जातेय. २८ दिवसांच्या अंतरानं दोन डोस दिले जात आहेत.


हेही वाचा

१२ ते १४ वयोगटातील मुलांना 'ही' लस देणार

आता पालिका सांडपाण्याचीही तपासणी करणार

पुढील बातमी
इतर बातम्या