Advertisement

१२ ते १४ वयोगटातील मुलांना 'ही' लस देणार

देशाभरात बुधवारपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांचं कोरोना लस दिली जात आहे.

१२ ते १४ वयोगटातील मुलांना 'ही' लस देणार
SHARES

देशाभरात बुधवारपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांचं कोरोना लस दिली जात आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा एकमेव जालीम उपाय आहे, त्यामुळं सर्वत्र लसीकरण केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांचे कोरोना लसीकरण सुरू करण्यात आलं आहे.

‘या’ मुलांना देणार लस

  • लसीसाठी वयाची १२ वर्षे पूर्ण झाली पाहिजेत, असे केंद्राने सांगितले आहे
  • बुधवारी लसीकरण करण्यासाठी जन्मतारीख १६ मार्च २०१० नंतरची नसावी
  • देशात १२ ते १४ वयोगटातील ७.११ कोटी मुले आहेत
  • पूर्वीप्रमाणेच या मुलांना Cowin पोर्टल www.cowin gov.in किंवा आरोग्य सेतू अॅपवरही नोंदणी करावी लागेल
  • एका मोबाइल नंबरवर ४ जणांची नावे नोंदवता येतील.
  • १५ वर्षांवरील किशोरवयीन मुलांप्रमाणे त्यांनाही ऑन-स्पॉट नोंदणीची सुविधा मिळेल.

‘ही’ लस दिली जाणार

  • या मुलांना हैदराबादच्या बायोलॉजिकल ई. कंपनीची कोर्बेवॅक्स लस दिली जाणार आहे
  • दुसरा डोस २८ दिवसांनी दिला जाईल
  • ही लस करोनाच्या बचावापासून ९० टक्के प्रभावी आहे
  • या लसीची चाचणी बीटा आणि डेल्टा व्हेरियंटवर करण्यात आली आहे

बुधवार १६ मार्चपासून ६० आणि त्याहून अधिक वयाचे सर्व वृद्धांना लसीचा प्रिकॉशन डोस म्हणजे तिसरा डोस देण्यात येणार आहे. यापूर्वी केवळ या वयोगटातील नागरिकांना प्रिकॉशन डोस हा फक्त गंभीर आजार असलेल्यांनाच दिला जात होता. शास्त्रज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर केंद्राने १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचवेळी १५ हून अधिक वयाच्या मुलांना आधीपासूनच सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत लस घेणे सुरू राहील, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने (NTAGI) १२-१४ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्याची शिफारस केली होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा