अंबोलीच्या रहिवाशांनो आता झोपा निवांत, महापालिकेने बदलली पाण्याची वेळ !

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अंधेरी पश्चिमेकडील अंबोली परिसरातील रहिवाशांना सद्यस्थितीत पाणी भरण्यासाठी मध्यरात्री ३.३० ते ५ दरम्यान झोपमोड करून उठावे लागते. पण येत्या बुधवारपासून रहिवाशांना निवांत झोप घेता येणार आहे. यामागचे कारण म्हणजे या भागात महापालिकेने नवीन जलवाहिनी टाकली असून रहिवाशांना आता मुबलक पाणी मिळणार आहे.  याचसोबत या विभागातील पाण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला असून सकाळी पावणे आठच्या सुमारास पाणी सोडण्यात येणार आहे.

महापालिकेच्या के-पश्चिम विभागातील पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. येत्या बुधवारी ४ ऑक्टोबर २०१७ पासून हे नवीन वेळापत्रक लागू होणार. या भागातील एस. व्ही. रोड, जे. पी रोड, वीरा देसाई रोड तसेच पंचम सोसायटी आदी परिसराला पाणी पुरवणाऱ्या जलवाहिन्या नव्याने टाकण्यात आल्या आहेत. त्यानंतर पाण्याच्या वेळेत बदल करण्यात येत असल्याची माहिती जलअभियंता अशोक तवाडिया यांनी दिली आहे. जलवाहिनी नव्याने टाकण्यात आल्यामुळे त्यांचे फ्लशिंग आणि क्लोरीनेशन केले आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून सुरुवातीचे दोन दिवस पाणी गाळून तसेच उकळून पिण्याचे आवाहन तवाडिया यांनी केले आहे.

'या' भागातील पाण्याची वेळ बदलली

एस. व्ही. रोड

  • सध्याची पाण्याची वेळ: मध्यरात्री ३.३० ते सकाळी ८.३०
  • बदल करण्यात आलेली वेळ: सकाळी ७.४५ ते १०.४५
  • परिसर: सैनिक नगर, रमेश नगर, म्हातारपाडा, याग्निक नगर, जयभवानी माता रोडचा परिसर

जे. पी. रोड

  • सध्याची पाण्याची वेळ: पहाटे ५.०० ते सकाळी ९.००
  • बदल करण्यात आलेली वेळ: सकाळी ७.४५ ते १०.४५
  • परिसर: सहकार नगर, आझाद नगर १,२, व ३, जीवन नगर, सरोटापाडा, शाह इंडस्ट्रियल रोड, फन रिपब्लिक रोड, ऑफ विरा देसाई रोड, प्राईम मिनिस्टर रोड, विरा देसाई रोड आझाद नगर मेट्रो स्टेशन ते गुंडेचा सिम्फोनी इमारतीलगतचा परिसर

वीरा देसाई स्पेशल

  • सध्याची पाण्याची वेळ: सकाळी १०.०० ते दुपारी १२.००
  • बदल करण्यात आलेली वेळ: सकाळी ७.४५ ते १०.४५
  • परिसर: शाह इंडस्ट्रियल रोड, फन रिपब्लिक रोड, ऑफ विरा देसाई रोड, प्राईम मिनिस्टर रोड, विरा देसाई रोड, आझाद नगर मेट्रो स्टेशन ते गुंडेचा सिम्फोनी इमारतीलगतच्या दुसऱ्या पदपथाचा परिसर

पंचम सोसायटी

  • सध्याची पाण्याची वेळ: सायंकाळी ५.०० ते ७.००
  • बदल करण्यात आलेली वेळ: सकाळी ७.४५ ते ९.४५
  • परिसर: पंचम सोसायटी आणि लगतचा परिसर


हेही वाचा - 

पाण्यासाठी महिलांची झोपमोड का? राष्ट्रवादी काँग्रेसचा महापालिका आयुक्तांना सवाल


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या