पवईत 24 तास पाणीपुरवठा बंद


SHARE

पवई - पवई व्हेंचुरी, एल विभागात पाइपलाइनच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणाराय. पाइप गळतीमुळे मोठ्या प्रमाणात इथं पाणी वाया जातंय. 21 डिसेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून ते 22 डिसेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत हे काम चालणाराय. त्या दरम्यान एल आणि एन पश्चिम विभागात 24 तास पाणीपुरवठा खंडित केला जाणाराय. त्यामुळे त्या परिसरातल्या नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिकेनं केलंय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या