हिंदमाताची पाणी तुंबण्याची समस्या संपणार, पालिकेकडून नवा प्रकल्प

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत थोडासा पाऊस पडला तरी दादरच्या हिंदमाता परिसरात पाणी तुंबतं. येथील पाणी तुंबण्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न मागील अनेक वर्ष मुंबई महापालिका करत आहे. मात्र, पावसाळ्यातील या समस्येपासून हिंदमाता परिसराची मुक्तता अद्याप झाली नाही. ही समस्या आता सुटण्याची शक्यता आहे. 

मुंबई महापालिकेकडून हिंदमाता येथे भूमिगत टाक्या बांधण्यात येत आहेत. या टाक्याचं काम पावसाळा सुरु होण्यापूर्वी काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रमोद महाजन उद्यान, हिंदमाता फ्लायओव्हर, सेंट झेव्हियर्स ग्राऊंड या तीन ठिकाणी भूमिगत टाक्यांची कामे सुरु आहेत.

हिंदमाता परिसर खोलगट असल्यामुळे पावसाळ्यात येथे पाणी साचतं. मुसळधार पाऊस झाल्यास या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबून त्याचा लवकर निचरा होत नाही. या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेमार्फत या भूमिगत टाक्या बांधण्यात येत आहेत.  या टाक्यामुळे हिंदमाता येथील पूरस्थिती कमी होणार आहे. या टाक्यांमध्ये अतिवृष्टीच्या काळात पावसाचे पाणी ३ तास साठवण्याची क्षमता असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.

या परिसरातील संत झेव्हिअर्स मैदानात भूमिगत टाकी बांधण्यात आली आहे. त्यानंतर हे पाणी परळपासून दादर पश्‍चिमेकडील स्वर्गीय प्रमोद महाजन उद्यानात आणण्यात येणार आहे. येथेही भूमिगत टाकी बांधण्यात आली आहे.

या कामाची पाहणी नुकतीच पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. नगरसेविका उर्मिला पांचाळ, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शवेलारसू, हायड्रॉलिक इंजिनियरिंग विभागाचे अभियंते यावेळी उपस्थित होते.



हेही वाचा -

मुंबईतील 'या' आठवड्याचं लसीकरण नियोजन जाहीर

दादर परिसरात टॅक्सी चालकाची हत्या

पुढील बातमी
इतर बातम्या