दादर परिसरात टॅक्सी चालकाची हत्या

एका फळविक्रेत्यानं दादर परिसरात एक टॅक्सी चालकाची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

दादर परिसरात टॅक्सी चालकाची हत्या
SHARES

एका फळविक्रेत्यानं दादर परिसरात एक टॅक्सी चालकाची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. छबीलाल जैस्वार (५५) असे मृत टॅक्सीचालकाचे नाव आहे. भाडे नाकारले म्हणून संतापलेल्या फळविक्रेत्याने डोक्यात पेव्हर ब्लॉक टाकून टॅक्सीचालकाची हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी दादर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज वरून काही तासांतच आरोपी बसवराज मेलिणामनी (३०) याला अटक केली आहे.

दादर परिसरातील कबुतरखाना इथं सकाळी ६ वाजताच्या सुमारास छबीलाल जैस्वार हा टॅक्सी घेऊन आला होता. यादरम्यान बसवराज त्या ठिकाणी आला आणि त्याने छबीलाल याला जवळच जायचे आहे असे सांगितले. मात्र, जवळचे भाडे असल्याने छबीलाल याने नकार दिला. याच परिसरात राहत असल्याने आणि फळविक्री करीत असल्याने बसवराज दादागिरी करू लागला. यावरून दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यामुळे संतापलेल्या बसवराज याने जवळच असलेला सिमेंटचा पेव्हर ब्लॉक उचलला आणि छबीलाल याच्या डोक्यात मारला. त्यात डोक्याला गंभीर इजा झाल्याने छबीलाल याचा जागीच मृत्यू झाला.

 या घटनेची माहिती मिळताच दादर पोलीस घटनास्थळी पोहचले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मृत्यूंजय हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक महेश थिटे यांच्यासह रावराणे, संतोष पाटणे, अजित महाडीक, महेश कोलते यांच्या पथकानं प्रत्यक्षदर्शीनी दिलेली माहीती आणि सीसीटीव्ही फुटेजवरून बसवराज याला शोधून काढले. घटनास्थळावरून पसार झालेल्या बसवराज याला काही तासांतच पोलिसांनी अटक केली.हेही वाचा - 

पीएफमधील ५ लाखांवरील गुंतवणुकीच्या व्याजावर लागणार कर

आयकर विभाग जूनमध्ये लाँच करणार नवे ई-फाइलिंग पोर्टल


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा