Advertisement

आयकर विभाग जूनमध्ये लाँच करणार नवे ई-फाइलिंग पोर्टल

सध्याचं पोर्टल १ ते ६ जूनपर्यंत बंद राहणार आहे. यादरम्यान महत्वाचे काम असेल तर ते त्याआधी पूर्ण करणे गरजेचे आहे.

आयकर विभाग जूनमध्ये लाँच करणार नवे ई-फाइलिंग पोर्टल
SHARES

आयकर विभाग करदात्यांसाठी ७ जूनपासून नवीन ई-फाइलिंग वेब पोर्टल सुरू करणार आहे. या पोर्टलचा वापर नियमित आयटीआर (Income Tax Return) भरणे आणि करसंबंधी इतर कामांसाठी करण्यात येणार आहे. 

सध्याचं पोर्टल १ ते ६ जूनपर्यंत बंद राहणार आहे. यादरम्यान महत्वाचे काम असेल तर ते त्याआधी पूर्ण करणे गरजेचे आहे. नवे पोर्टल जास्त युजर फ्रेंडली असेल असं सांगण्यात आलं आहे. 

आयकर विभागाच्यावतीने जारी करण्यात आलेल्या सूचनेत म्हटलं आहे की, जुने पोर्टल  (www.Incometaxindiaefiling.Gov.In) वरून नव्या पोर्टलवर जाण्याचे काम पूर्ण होईल आणि ७ जूनपर्यंत पोर्टल लाँच करण्यात येईल. लाँचची तयारी आणि मायग्रेशनशी संबधीत कामांसाठी १ ते ६ जूनपर्यंत करदाते आणि कर अधिकारी दोघांसाठी संबधित वेब पोर्टल उपलब्ध असणार नाही.

या नवीन ई-फाइलिंग पोर्टलच्या वापर करून करते आपले आयटी रिटर्न फाइल करू शकतात. तसंच रिफंड आणि इतर कामांसाठी आपली तक्रारही कर अधिकाऱ्यांकडं नोंदवू शकतात. 



हेही वाचा -

आता घरीच करा कोरोना चाचणी; वाचा कशी करायची?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा