Advertisement

परवानाधारक रिक्षा चालकांना 'अशी' मिळेल आर्थिक मदत, करावा लागेल अर्ज

या लॉकडाऊनमुळं हातावर पोट असलेल्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. त्यामुळं यांच्यावरील आर्थिक संकट काहीसं दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजातील काही घटकांना मदत देण्याची घोषणा केली.

परवानाधारक रिक्षा चालकांना 'अशी' मिळेल आर्थिक मदत, करावा लागेल अर्ज
SHARES

मुंबईसह (mumbai) राज्यभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळं हातावर पोट असलेल्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. त्यामुळं यांच्यावरील आर्थिक संकट काहीसं दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजातील काही घटकांना मदत देण्याची घोषणा केली. त्यामध्ये परवानाधारक रिक्षा चालकांचा समावेश करणात आला. त्यानुसार आता परवानाधारक रिक्षाचालकांना एकवेळचे अर्थसहाय्य म्हणून १ हजार ५०० रुपये अर्थ सहाय्य केलं जाणार आहे.

परवानाधारक रिक्षाचालकांना एकवेळचे अर्थसहाय्य म्हणून १ हजार ५०० रुपये एवढे अर्थ सहाय्य देण्याबाबत १९ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात आला आहे. रिक्षा चालकांना कोणतेही कागदपत्र सादर न करता केवळ ऑनलाईन प्रणालीवर त्यांचा वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक आणि आधार क्रमांक नोंद करावा लागणार आहे. सदर माहिती संगणक प्रणालीवर प्रमाणित करण्यात येईल.

याबाबत कार्यप्रणाली ICICI बँकेमार्फत विकसित करण्यात आली आहे. त्याबाबतची चाचणी अंतिम टप्यात आहे. २२ मेपासून रिक्षा चालकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील रिक्षा संघटना प्रतिनिधींना अर्ज प्रक्रियेबाबत ऑनलाईन सादरीकरण २१ मेरोजी करण्यात येणार आहे. रिक्षा चालकांच्या अर्थ सहाय्यासाठी शासनाकडून संपूर्ण निधी उपलब्ध झाला आहे.

ज्या रिक्षा चालकांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील, त्यांना एक वेळचे अर्थसहाय्य त्यांच्या संबंधीत बँक खात्यात त्वरित जमा होणार आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

शासनाने लॉकडाऊन लावले आहे. दुकान बंद असल्याने रोजंदारीवर खूप मोठा परिणाम झाला आहे. अनेक फेरीवाले, बांधकाम कामगार आणि रिक्षा-टॅक्सी चालक यांना शासनाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे उदाहरण समोर ठेवून बाधित घटकांसाठी तात्काळ मदत करावी. सर्व रिक्षा चालक बंधू सार्वजनिक दळणवळणचा अविभाज्य घटक असल्याने त्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात यावे. त्याशिवाय लॉकडाऊन काळातील सर्व रिक्षा चालकांचे पाणी बिल आणि प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्यात यावा, अशी मागणी केली जात असल्याची माहिती समोर येत आहे.



हेही वाचा - 

मुंबईच्या पालकमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त किनारपट्टीची पाहणी

चक्रीवादळानंतरही मुंबईत पावसाच्या हलक्या सरी


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा