Advertisement

चक्रीवादळानंतरही मुंबईत पावसाच्या हलक्या सरी

चक्रीवादळानंतर सलग २ दिवस पावसानं हजेरी लावली. दरम्यान हवामान विभागानं मुंबई आणि आसपासच्या परिसराला सतर्क राहण्याचा इशारा दिला होता.

चक्रीवादळानंतरही मुंबईत पावसाच्या हलक्या सरी
SHARES

मुंबई आणि परिसराला झोडपून तौक्ते वादळ सोमवारीच गुजरातच्या दिशेने सरकले असले तरी मंगळवारी सकाळीही शहर आणि उपनगरात पावसाच्या सरींनी हजेरी लावली. चक्रीवादळानंतर सलग २ दिवस पावसानं हजेरी लावली. दरम्यान हवामान विभागानं मुंबई आणि आसपासच्या परिसराला सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी ही पावसानं हजेरी लावली.

पावसामुळं मुंबईत थंड वातावरण असून, तापमानातही जवळपास ४ अंश सेल्सिअसची घट झाली आहे. मे महिन्यातील निच्चांकी किमान तापमानाची नोंद मंगळवारी झाली. तौक्ते वादळामुळे सोमवारी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळला. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्राने २०७.६ मिमि तर सांताक्रुझ केंद्राने २३०.३ मिमि पावसाची नोंद केली. पाऊस आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यांमुळे मुंबईच्या तापमानात घट झाली.

सोमवारच्या तुलनेत मंगळवारी किमान तापमान साधारण चार अंश सेल्सिअसने घसरले. मंगळवारी कुलाबा केंद्राने २५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली तर सांताक्रुझ केंद्राने २३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली. मुंबईतील मे महिन्यातील निच्चांकी किमान तापमानाची ही तिसरी नोंद आहे. यापूर्वी ८ मे २०१३ रोजी २३.६ अंश सेल्सिअस किमान तापमान मुंबईत नोंदवण्यात आले होते.

आतापर्यंतची मे महिन्यातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद १२ मे १९८५ रोजी करण्यात आली असून त्या दिवशी मुंबईत २०.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते. पुढील दोन दिवस मुंबई आणि परिसरात  तुरळक सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.हेही वाचा - 

कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसतेय, मात्र.. मुख्यमंत्र्यांनी केलं महत्त्वाचं विधान

मुंबईच्या पालकमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त किनारपट्टीची पाहणी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा