लिओपोल्ड कॅफेवर महापालिकेचा हातोडा!

  • मुंबई लाइव्ह टीम & निलेश अहिरे
  • सिविक

मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी कुलाब्यातील प्रसिद्ध लिओपोल्ड कॅफेवर कारवाई करत फुटपाथवरील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला.

लिओपोल्ड कॅफे दक्षिण मुंबईतील जुन्या रेस्टाॅरंटपैकी एक आहे. २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी याच रेस्टाॅरंटमध्ये घुसून गोळीबार केला होता.

कारवाईचं कारण काय?

लिओपोल्ड कॅफेच्या मालकाने मुंबई महापालिकेच्या परवानगीशिवाय फूटपाथवर अनधिकृत बांधकाम केलं होतं. फूटपाथवर पिलर उभारून त्यावर छत बांधण्याचा लिओपोल्ड कॅफेच्या मालकाचा प्रयत्न होता.

या अनधिकृत बांधकामाची तक्रार प्राप्त होताच मुंबई महापालिकेने लिओपोल्ड कॅफेला मंगळवारी ३५४ (अ) अंतर्गत अनधिकृत बांधकाम हटवण्याची नोटीस बजावली होती.

नोटीस बजावूनही...

त्याचसोबत कोणत्या परवानगीनुसार हे पिलर उभारण्यात आले, याचं उत्तर २४ तासांच्या आत देण्यास बजावण्यात आलं होतं. तरीही लिओपोल्ड कॅफेकडून नोटिशीला कोणतंही उत्तर न देण्यात आल्याने अखेर मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने हे अनधिकृत बांधकाम तोडलं.


हेही वाचा-

मुंबईची तुंबई झाल्यास जबाबदारी 'यांची'

डिजिटल होर्डिंगला पालिका देणार प्रोत्साहन


पुढील बातमी
इतर बातम्या