महापालिकेच्या 4 जलतरण तलावात महिलांसाठी २५ टक्के सवलत

(File Image)
(File Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महापालिकेचे चार जलतरण तलाव सध्या कार्यरत आहेत. या तलावांमध्ये सकाळी ११ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते ६ ही सत्रे केवळ महिलांसाठी राखीव आहेत. या सत्रांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या महिलांना सभासद शुल्कामध्ये तब्बल २५ टक्क्यांची सूट देण्यास पालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे. ८ मार्च रोजी महिला दिनापासून ही सवलत योजना लागू होणार आहे.

दादर, कांदिवली, चेंबूर, दहिसर या जलतरण तलावांच्या ठिकाणी नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने सभासदत्व देण्यात आले आहे. यासाठी वार्षिक आठ हजार रुपये ते १० हजार १०० रुपये इतके शुल्क आहे. तसेच त्रैमासिक व मासिक सभासदत्वाची सुविधादेखील उपलब्ध आहे.

महिलांच्या राखीव सत्रांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या महिलांना वार्षिक सभासदत्व शुल्क हे रुपये १०,१०० ऐवजी रुपये ७,७०० इतके होईल. तर, छोट्या तरण तलावांचे वार्षिक सभासदत्व शुल्क हे रुपये ८,००० ऐवजी रुपये ६,०८० इतके होईल. याच पद्धतीने त्रैमासिक आणि मासिक शुल्कात देखील २५ टक्क्यांची सवलत योजना लागू करण्यात आली आहे.

आधीपासून सभासद असणाऱ्या महिलांनादेखील ही सवलत योजना लागू करण्यात आली आहे. यानुसार इच्छुक महिलांनी तसा अर्ज जलतरण तलाव व्यवस्थापकांकडे दिल्यास त्यांनी पूर्वी भरलेल्या शुल्काचे व उपयोगात आणलेल्या कालावधीतून संबंधित सभासदत्वाचा कालावधी वाढवून दिला जाणार आहे.

या लिंकवर करा नोंदणी

महिला दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात येत असलेल्या या योजनेत नोंदणी करावयाची असल्यास त्याची ऑनलाइन लिंक ८ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजता कार्यान्वित होणार आहे. इच्छुक महिलांनी https.//swimmingpool.mcgm.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

4 जलतरण तलाव जेथे सदस्यता उपलब्ध आहेत:

  • महात्मा गांधी मेमोरियल ऑलिम्पिक जलतरण तलाव, दादर (पश्चिम)
  • जनरल अरुणकुमार वैद्य ऑलिम्पिक जलतरण तलाव, चेंबूर (पश्चिम)
  • श्री मुरबली देवी जलतरण तलाव, दहिसर (पूर्व)
  • सरदार वल्लभभाई पटेल ऑलिम्पिक जलतरण तलाव, कांदिवली (पश्चिम)

हेही वाचा

कुर्ल्यातील 'या' भागात दर शनिवारी पाणीपुरवठा बंद

तांञिक कारणामुळे मागे घेण्यात आलेल्या बसेसपैकी 250 CNG बसेस पुन्हा रस्त्यावर

पुढील बातमी
इतर बातम्या