Advertisement

कुर्ल्यातील 'या' भागात दर शनिवारी पाणीपुरवठा बंद

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) कुर्ल्यातील जलवाहिन्या दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले आहे

कुर्ल्यातील 'या' भागात दर शनिवारी पाणीपुरवठा बंद
(File Image)
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) कुर्ल्यातील जलवाहिन्या दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले आहे, जे पूर्ण होण्यासाठी सुमारे 10 दिवस लागतील.

त्यामुळे, पालिकेने 4 मार्चपासून मुंबईतील कुर्ला परिसरात असलेल्या खैरानी रोडवर दर शनिवारी पाणीपुरवठा बंद करण्याची घोषणा केली आहे.

खैरानी रोडवरील संघर्ष नगर, सुभाष नगर, भानुशाली वाडी, यादव नगर, दुर्गामाता मंदिर, कुलकर्णी वाडी, डिसोझा कंपाऊंड, लक्ष्मी नारायण मार्ग, जोश नगर, आझाद मार्केट या भागात पाणीपुरवठा खंडित केला आहे.

स्थानिकांची दीर्घकाळ होणारी गैरसोय टाळण्यासाठी आणि पाणीपुरवठा खंडित होण्याचा कालावधी कमी करण्यासाठी, पालिकेने जाहीर केले आहे की ते सतत बंद न ठेवता पुढील १० शनिवारी टप्प्याटप्प्याने आवश्यक कामे करणार आहेत.

याशिवाय, नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाणी जपून वापरावे तसेच दर रविवारी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन नागरीकांनी केले आहे.



हेही वाचा

बाणगंगेपर्यंत पोहोचणे होणार सोपे, कवळे मठ ते बाणगंगा नवा रस्ता बनणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा