Advertisement

बाणगंगेपर्यंत पोहोचणे होणार सोपे, कवळे मठ ते बाणगंगा नवा रस्ता बनणार

यासाठी 18.30 मीटरचा डीपी रस्ता कवळे मठापासून थेट बाणगंगेला जोडण्यात येणार आह

बाणगंगेपर्यंत पोहोचणे होणार सोपे, कवळे मठ ते बाणगंगा नवा रस्ता बनणार
SHARES

मुंबईचा अध्यात्मिक वारसा असलेल्या वाळकेश्वर येथील प्राचीन तलाव असलेल्या बाणगंगेपर्यंत पर्यटक आणि भाविकांना पोहोचणे सोपे होणार आहे. यासाठी 18.30 मीटरचा डीपी रस्ता कवळे मठापासून थेट बाणगंगेला जोडण्यात येणार आहे. त्याच्या कामाची निविदा येत्या काही दिवसांत निघणार आहे.

पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, यासोबतच तेथे असलेल्या पालिका शाळेजवळील रस्ताही रुंदीकरण करून बाणगंगेला जोडला जाईल. बाणगंगेपर्यंत सहज पोहोचण्याबरोबरच सुशोभीकरणाचे कामही ६ महिन्यांत पूर्ण होणार आहे. मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा म्हणाले की, बाणगंगा हा देशाचा प्राचीन आणि धार्मिक वारसा असल्याने राज्य प्राधान्याने सुशोभीकरणाचे काम करत आहे.

डी वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर शरद उघाडे म्हणाले की, पालिका जीएसबी ट्रस्टच्या समन्वयाने या जागेला एएसआयच्या स्मारक सूची अंतर्गत बी-श्रेणीचे पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्यानंतर वेगाने काम करत आहे. श्रीमाळी ब्राह्मण ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त महेशचंद्र के. ठाकूर यांनी सांगितले की, ट्रस्टच्या सर्व लोकांनी बाणगंगापर्यंत सोपा मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी आमदारांसमोर ठेवली होती आणि आता ही मागणी लवकरच पूर्ण होत असल्याचा आनंद आहे.

डी वॉर्डचे सहाय्यक अभियंता मनोज जेऊरकर म्हणाले की, पालिका शाळेजवळील बाणगंगेकडे जाणारा रस्ता एक कोटी खर्चून फेज वन अंतर्गत कोबल स्टोनने सुशोभित करण्यात येणार आहे. बाणगंगेपर्यंत सहज पोहोचण्यासाठी रस्त्याचे काम जोडण्यात आले आहे. यासोबतच बाणगंगेतील भिंतींना मोनो कलर आणि तिथून दिसणार्‍या इमारतींना एकसमान रंग दिला जाणार आहे.

फेज 2 मध्ये, 2025 पर्यंत व्यापक कनेक्टिव्हिटी अंतर्गत ते समुद्रकिनाऱ्याशी जोडले जाईल आणि रामकुंडमध्ये एक मोठे मनोरंजन क्षेत्र देखील तयार केले जाईल.



हेही वाचा

बाबुलनाथ मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय, आता केवळ..

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा