Advertisement

मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या

या आहेत नव्या तारखा

मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या
SHARES

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने 9 फेब्रुवारी आणि 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा आता 24 फेब्रुवारी आणि 25 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार  5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडेल. 

मुंबई विद्यापीठाच्या कधी होणार परीक्षा?

यापूर्वी महापालिका निवडणुकांमुळे 14 जानेवारी ते 16 जानेवारीदरम्यान होणाऱ्या परीक्षाही विद्यापीठाला पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. त्या परीक्षा 5 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारीदरम्यान घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले होते.

पण राज्य निवडणूक आयोगाने मागील महिन्यात निवडणुकीची आचारसंहिता जाहीर केल्यावर विद्यापीठाने आधी नियोजित केलेल्या 4 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. या परीक्षा आता 17 फेब्रुवारी, 18 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी रोजी होणार आहेत.

विद्यापीठाने बुधवारी 28 जानेवारी रोजी दुपारच्या सत्रातील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्या परीक्षा 23 फेब्रुवारीला दुपारी 2:30 वाजेपासून ते 4:30 वाजेदरम्यान दरम्यान घेतल्या जातील.

जिल्हा परिषद निवडणूक

राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत दुखवटा जाहीर केला होता. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 वाजेपासून ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडेल. संबंधित ठिकाणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल.  



हेही वाचा

मिरा–भाईंदरमध्ये फ्लायओव्हरखाली डॉग पार्क उभारण्याचा निर्णय

मंडाले-चेंबूर मेट्रो एप्रिलपासून सुरू होणार, MMRDA ची घोषणा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा