कोरोना रुग्णांचा वाढता आकडा, पालिकेच्या नव्या गाईडलाईन्स

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गेल्या आठवड्यापासून कोविड-19 प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. यामुळे चौथ्या लाटेची शक्यता असल्याने, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने सर्व प्रयोगशाळा आणि रुग्णालयांना सतर्क केले आहे. 4 जून रोजी नवीन आदेश जारी केले आहेत. पालिकेने सर्व नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. शिवाय पावसाळा सुरू झाल्याने जलजन्य आजारांचा इशारा नागरीकांनी दिला आहे.

नवीन मार्गदर्शक तत्त्वे :

  • नागरिकांना मास्क घालण्याचे आणि कोविड-योग्य वर्तनाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
  • चाचण्या वाढवाव्यात
  • सर्व जंबो कोविड केंद्रे, चाचणी प्रयोगशाळा आणि खाजगी रुग्णालये सुसज्ज आणि सज्ज असतील
  • झोपडपट्टी भागात स्वच्छतेची कामे हाती घेण्यात येणार आहेत
  • पावसाळ्याशी संबंधित रोग आणि कोविड-19 5 या दोन्हींचा प्रसार रोखण्यासाठी - सार्वजनिक शौचालये दिवसातून 5 वेळा निर्जंतुक केली जातील
  • लसीकरण मोहिमेला गती देणे (विशेषतः किशोरवयीन)

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 1 हजार 494 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारी 614 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 77 लाख 38 हजार 564 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.04% एवढे झाले आहे.

राज्यात आज 1494 नवीन रुग्णांचे निदान झालेय. तर एका रुग्णाचा मृत्यू झालाय. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87 टक्के एवढा आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या सहा हजार 767 इतकी झाली आहे.


हेही वाचा

कोरोना लसीकरणासाठी BMC ची 'हर घर दस्तक' मोहीम

मास्क बंधनकारक नाही, तर... - राजेश टोपे

पुढील बातमी
इतर बातम्या