मुंबई महानगरपालिकेने (BMC) सर्व बांधकाम स्थळांवर सेन्सर-आधारित एअर पॉल्युशन मॉनिटर्स बसवणे अनिवार्य केले आहे, ज्याद्वारे हवेच्या गुणवत्तेची माहिती रिअल-टाइममध्ये जनतेला उपलब्ध होईल.
मात्र, जून 2025 मध्ये जारी केलेल्या निर्देशानंतरही जवळपास निम्म्या बांधकाम स्थळांनी अजूनही नियमांचे पालन केलेले नाही.
महानगरपालिकेने आता एक महिन्याची अंतिम मुदत (ultimatum) दिली आहे. पालिकेने स्पष्ट इशारा दिला आहे की, जे विकसक (developers) नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
हायकोर्टाच्या आदेशानंतर निर्देश जारी
हा निर्देश बॉम्बे हायकोर्टाच्या 2023 मधील स्वयंप्रेरित जनहित याचिका (PIL No. 3 of 2023) प्रकरणाशी संबंधित आहे. या आदेशात बांधकाम स्थळांवरील धूळ आणि हवेच्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्यास सांगितले होते.
यासाठी BMC च्या पर्यावरण विभागाने PM2.5 आणि PM10 मॉनिटरिंग उपकरणांसाठी Expression of Interest (EOI) काढला होता, ज्याद्वारे मानक उपकरणे ओळखून मंजूर करण्यात आली.
सुमारे 13 कंपन्या तांत्रिक निकष पूर्ण करत असल्याने शॉर्टलिस्ट करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत सुमारे 1,200 सक्रिय बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये मंजूर विक्रेत्यांकडून हवेच्या गुणवत्तेचे मॉनिटरिंग सिस्टीम बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
फक्त 44% प्रकल्पांनीच पालन केले
आत्तापर्यंत 535 विकसकांनी निर्देशांचे पालन केले आहे, तर 168 जण अजून प्रक्रियेत आहेत.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले,
“उर्वरित विकसकांनी जर नियमांचे पालन केले नाही, तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल.”
या मॉनिटरिंग यंत्रांद्वारे रिअल-टाइम प्रदूषणाची माहिती LED बोर्डवर प्रदर्शित करणे आणि ती BMC च्या केंद्रीय सर्व्हरवर सतत पाठवणे बंधनकारक आहे.
पालन न केल्यास परिणाम गंभीर असू शकतात
प्रकल्प मंजुरी निलंबित केली जाऊ शकते
बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले जाऊ शकतात
आर्थिक दंड आकारला जाऊ शकतो
किंवा संपूर्ण साइट बंद केली जाऊ शकते
माजी विरोधी पक्षनेत्यांचा संताप
BMC चे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापालिकेवर टीका केली. त्यांनी म्हटलं की, “AQI अनेक दिवस ‘गंभीर’ (Severe) पातळीवर होता, तरी BMC ने 28 ऑक्टोबरपर्यंत 600 पेक्षा जास्त साइट्सवर कारवाईची केवळ धमकी दिली. बांधकाम व्यावसायिक नोटीस दुर्लक्षित करतात. कारण कारवाई नेहमी उशिरा किंवा कमी प्रमाणात होते.
हा निर्णय मुंबईतील वाढत्या वायूप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. महानगरपालिकेचे म्हणणे आहे की, यामुळे बांधकाम क्षेत्रातून होणाऱ्या धूळप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.
हेही वाचा