मुंबई कोस्टल रोडलगत पुनर्भरण (reclaimed) केलेल्या 77 हेक्टर जमिनीचे समतलीकरण करण्यासाठी (levelling) Brihanmumbai Municipal Corporation (BMC) सार्वजनिक निधीतून 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करणार आहे. त्यानंतर ही जमीन लँडस्केपिंगसाठी रिलायन्स फाऊंडेशनकडे (Reliance Foundation) सोपवली जाणार आहे. या जमिनीचे सौंदर्यीकरण करण्याचा करार रिलायन्स फाउंडेशनला देण्यात आला आहे.
अंदाजे 400 कोटी रुपयांचा हा प्रकल्प CSR अंतर्गत पूर्ण केला जाणार आहे. फाउंडेशनच्या प्रमुख नीता अंबानी यांनी अलीकडेच ‘कोस्टल गार्डन्स’ तयार करण्याची घोषणा केली आहे. ते मुंबईसाठी एक ‘ग्रीन लंग’ ठरेल असे त्यांनी सांगितले.
सुरुवातीला सर्व काम रिलायन्स करणार असे ठरले होते. मात्र, त्यांनी महानगरपालिकेला जमीन समतल करण्याची आणि पुन्हा पृष्ठभाग तयार करण्याची (resurfacing) विनंती केली आहे. झाडे लावण्यासाठी जमीन 900 मिमी उंचीपर्यंत मातीने भरली जाणार आहे.
एका भागात कामाला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यापूर्वी काही भूखंड रिलायन्सकडे सुपूर्द करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून पावसात लावलेली झाडे आणि झुडपे चांगली वाढतील,” असे या प्रकल्पाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले.
‘कोस्टल रोड गार्डन्स’ तीन हंगामांत पूर्ण होणार आहेत. भूषण गगरानी यांनी साऊथ मुंबई रेसिडेंट्स असोसिएशन आयोजित नागरिक संवाद कार्यक्रमात वेळापत्रक जाहीर केले होते. या कार्यक्रमात कोस्टल रोड गार्डन्सचा प्राथमिक आराखडाही सादर करण्यात आला होता.
या आराखड्यामुळे मुंबईकरांना मोठ्या हिरव्या मोकळ्या जागेची आशा निर्माण झाली आहे. योजनेनुसार, एकूण क्षेत्रफळापैकी 55% भाग ‘फॉरेस्ट्स अँड वुड्स’, 25% ‘ओपन रिक्रिएशनल एरियाज’, 10% ‘पाथवेज’ आणि 10% ‘प्लाझा’साठी राखीव असेल.
तसेच, या गार्डन्समध्ये मियावाकी मायक्रोफॉरेस्ट पॉकेट्स, अर्बन पार्कलँड पॉकेट्स आणि अर्बन वुडलँड पॉकेट्स यांसारख्या सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.
हेही वाचा