पालिकेकडून 'या' वॉर्डांमधील फूटपाथच्या सुशोभीकरण, दुरुस्तीचा प्रस्ताव

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) पश्चिम उपनगरातील तीन महापालिका प्रभागांमध्ये पदपथाचे सुशोभीकरण आणि दुरुस्तीचे काम प्रस्तावित केले आहे. जेणेकरून ते अतिक्रमणमुक्त आणि पादचाऱ्यांसाठी अनुकूल असतील.

HT च्या वृत्तानुसार, पालिका अंधेरी (पश्चिम), बोरिवली, दहिसर, जुहू वर्सोवा लिंक रोडचे काही भाग, दहिसरमधील एसव्ही रोड तसंच दहिसर आणि बोरिवलीमधील लिंक रोड इथली आठ ठिकाणं शोधली आहेत.

योजनेनुसार, सध्याचे पेव्हर ब्लॉक फूटपाथ सिमेंट-काँक्रीटनं बदलले जातील ज्यामुळे चालणे सोपे होईल अशी अपेक्षा आहे. यामध्ये पदपथावरील आसनव्यवस्था, त्यानंतर रस्ता चिन्हे बसवणे यांचाही समावेश होता. शिवाय, भिंतीवर वेगवेगळी चित्र रेखाटली जातील.

या महिन्याच्या सुरुवातीला पालिकेनं यासाठी निविदा काढल्या आहेत आणि एकूण खर्च ९.३५ कोटी ठेवण्यात आला आहे. याशिवाय या प्रकल्पासाठी वर्षभराचा कालावधी देण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

२०२० मध्ये, प्रशासकिय प्राधिकरणानं कुलाबा आणि काळा घोडा या दक्षिण मुंबईतील काही हेरिटेज स्पॉट्समधील फूटपाथच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले होते.

त्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये, पालिकेच्या रस्ते विभागानं मध्य आणि दक्षिण मुंबईतील ३३ वेगवेगळ्या ठिकाणी फूटपाथवरील कामांसाठी आराखडा काढला. या पूर्वीच्या प्रकल्पांमध्ये, प्रशासकिय संस्थेनं सध्याच्या पेव्हर ब्लॉकच्या जागी सिमेंट आणि काँक्रीटचे फूटपाथ बनवले होते.


हेही वाचा

डोंबिवली आणि कल्याण पूर्वच्या ‘या’ परिसरांमध्ये वीजपुरवठा खंडित

ध्वनी प्रदुषण, लाऊडस्पीकर संदर्भात हायकोर्टात अवमान याचिका

पुढील बातमी
इतर बातम्या