Advertisement

ध्वनी प्रदुषण, लाऊडस्पीकर संदर्भात हायकोर्टात अवमान याचिका

मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी अवमान याचिका सादर करण्यात आली आहे.

ध्वनी प्रदुषण, लाऊडस्पीकर संदर्भात हायकोर्टात अवमान याचिका
SHARES

राज्यभरातील धार्मिक प्रार्थनास्थळांवर असलेल्या बेकायदेशीर भोंग्यांवर कारवाई करण्याचे आदेश देऊनही त्यावर प्रशासनाकडून कारवाई होत नाही. याची तक्रार देत मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी अवमान याचिका सादर करण्यात आली आहे.

यावर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार देत हायकोर्टानं सुनावणी १४ जून रोजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. नवी मुंबईतील रहिवासी संतोष पाचलग यांनी साल २०१८ मध्ये ही अवमान याचिका दाखल केली होती. साल २०१६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं याबाबत ३८ स्पष्ट निर्देश देऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल राज्य सरकराच्या दिरंगाईवर हायकोर्टानं वारंवार नाराजी व्यक्त केली होती.

राज्य सरकारनं साल २०१८ मध्ये यासंदर्भात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार राज्यभरात २९४० अनधिकृत भोंगे होते. ज्यात १०२९ मंदिरं, १७६६ मशिदी, ८४ चर्च, २२ गुरूद्वारा आणि ३९ बुद्ध विहारांचा समावेश असल्याचं मान्य केलं होतं.

या भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदुषणाचा त्रास तिथल्या स्थानिक रहिवाश्यांना सहन करावा लागतो, असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. मात्र सामाजिक धार्मिक तेढ निर्माण होईल अशा मुद्यावर कारवाईस वेळ लागत आहे, अशी भूमिका प्रशासनाच्यावतीनं घेण्यात आली होती.



हेही वाचा

नाशिकमध्ये भोंग्यासाठी परवानगी आवश्यक, सर्वधर्मियांसाठी आदेश जारी

पर्यटकांसाठी आता गिरगाव चौपाटीवरही ‘व्ह्युईंग डेक’

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा