Advertisement

नाशिकमध्ये भोंग्यासाठी परवानगी आवश्यक, सर्वधर्मियांसाठी आदेश जारी

धार्मिक स्थळांवर भोंगा लावण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे नाशिकमध्ये बंधनकारक करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये भोंग्यासाठी परवानगी आवश्यक, सर्वधर्मियांसाठी आदेश जारी
SHARES

धार्मिक स्थळांवर भोंगा लावण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे नाशिकमध्ये बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व धार्मिक स्थळांसाठी हा नियम लागू असणार आहे. ३ मेपर्यंत भोंग्याची परवानगी घेण्याकरिता धार्मिक स्थळांना अर्ज करता येणार आहे. त्यानंतर परवानगी न घेता लावलेल्या भोंग्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

नाशिकचे पोलिस आयुक्त दिपक पांडे यांनी या नियमाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, सुप्रीम कोर्टानं धार्मिक स्थळांना भोंग्यांसाठी डेसिबलची मर्यादा आणि इतर नियमही ठरवून दिले आहेत. त्यानुसारच नाशिक पोलिसांनी महाराष्ट्र अनिधनयमाच्या कलम ४० नुसार हा आदेश दिला आहे. त्यानंतर ३ मेपर्यंत धार्मिक स्थळावंर लाऊड स्पीकर लावण्यासाठी रीतसर अर्ज करावा लागणार आहे. हा अतिशय गंभीर निर्णय असून सर्व नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी दिले.

मशिदीच्या १०० मीटर परिसरात तसंच अजानच्या १५ मिनिटं अगोदर भोंग्यावर हनुमान चालिसा लावण्यावरदेखील नाशिक पोलिसांनी बंदी घातली आहे. सामाजिक सहिष्णुता कायम राहावी, यासाठी हा आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

याव्यतिरिक्त इतर कोणत्याही धर्मीयांना कोणतंही बंधन घालण्यात आलेलं नाही. कुणीही कुठेही हनुमान चालिसा म्हणू शकतो. फक्त त्यांनी नियमांच्या अधीन राहावं, असं आवाहनही नाशिक पोलिस आयुक्तांनी दिले.

भोंग्याबाबत जारी केलेल्या नियमावलीचा भंग केल्यास संबंधिताविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही नाशिक पोलिस आयुक्तांनी दिली आहे. अशा आरोपीविरोधात ४ महिने ते १ वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची कायद्यात तरतूद आहे.

याशिवाय आरोपीनं धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या शिक्षेत कायद्यानुसार आणखी वाढ होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा

दादर-प्रभादेवी परिसरातील 'या' ६ मार्गांवर मंगळवारी वाहतुक बंदी

पर्यटकांसाठी आता गिरगाव चौपाटीवरही ‘व्ह्युईंग डेक’

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा