Advertisement

दादर-प्रभादेवी परिसरातील 'या' ६ मार्गांवर मंगळवारी वाहतुक बंदी

मंगळवार, १९ एप्रिल रोजी अंगारिका संकष्टी चतुर्थी निमित्त प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिरात मोठ्या संख्येनं भाविक येतात.

दादर-प्रभादेवी परिसरातील 'या' ६ मार्गांवर मंगळवारी वाहतुक बंदी
(File Image)
SHARES

मंगळवार, १९ एप्रिल रोजी अंगारिका संकष्टी चतुर्थीचे आहे. यानिमित्त प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिरात मोठ्या संख्येनं भाविक येतात. त्यामुळे परिसरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याच कारणास्तव मुंबई वाहतूक पोलिसांनी दादर-प्रभादेवी परिसरातील वाहतूकित बदल केला आहे.

वाहतूक अधिसूचना जारी करण्यात आली आहे ज्यात नमूद केलं आहे की, गर्दीमुळे सहा रस्ते प्रभावित होतील.

  • एस. वीर सावरकर रोड
  • एसके बोले रोड
  • गोखले रोडचा उत्तर आणि दक्षिणेकडील भाग
  • काकासाहेन गाडगीळ मार्ग
  • सयानी रोड
  • आप्पासाहेब मराठे मार्ग

मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत वाहतूकित बदल करण्यात आले आहेत. गोखले रोडपासून एसके बोले रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दुसरीकडे गोखले रोडपासून दत्ता राऊळ रोड आणि एनएम काळे रोडवरून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश नसेल. तसंच आगर बाजार जंक्शनपासून एसके बोले रोडवर कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.

शिवाय, एसके बोले रोडवरून, केवळ सिद्धिविनायक जंक्शनपासूनच प्रवेशाला परवानगी असेल. दरम्यान, लेनिनग्राड जंक्शनपासून शंकर घाणेकर रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश मिळणार नाही.



हेही वाचा

पर्यटकांसाठी आता गिरगाव चौपाटीवरही ‘व्ह्युईंग डेक’

व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार मेट्रोचं तिकीट, ‘या’ नंबरवर करा मेसेज

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा