हॉटेल-रेस्टॉरंटसाठी बीएमसीची नियमावली जारी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मागील सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार ५ आॅक्टोबरपासून ५० टक्के सुरू होणार आहेत. यासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीसोबतच मुंबई महापालिकेने इतरही काही नियम जारी केले आहेत. त्यामुळे मुंबईतील हॉटेल मालकांना राज्य सरकारच्या नियमावलीसोबतच मुंबई महानगर पालिकेच्या नियमांचंही पालन करावं लागणार आहे.

ग्राहकांची हॉटेलमधील गर्दी टाळण्यासाठी प्री-बुकींग आणि पार्सल पद्धतीवरच भर देण्याबाबत महापालिकेच्या वतीने सुचना देण्यात आल्या आहेत. तसंच हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बारमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक असणार आहे. तसंच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक असणार आहे.

बीएमसीची नियमावली 

- मुंबईतले हॉटेल-रेस्टॉरंट सुरु झाल्यानंतर हॉटेल्समध्ये टेबलचं प्री-बुकींग आवश्यक

- ठरावीक संख्येपेक्षा जास्त ग्राहक एका वेळी हॉटेलमध्ये येऊ शकणार नाहीत

- दोन टेबलमध्ये २ ते ३ फुटांचं अंतर आवश्यक

- टेबल आणि किचनची वेळोवेळी स्वच्छता होणं गरजेचं आहे

- हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची वेळोवेळी वैद्यकीय चाचणी आणि कोविड टेस्ट करणंही गरजेचं असेल


हेही वाचा -

डॉक्टरांना कामाचे दिवस जास्त आणि क्वारंटाईनसाठी फक्त एक दिवस

अंधेरीतील 'त्या' इमारतीत २२ जणांना कोरोनाचा संसर्ग


पुढील बातमी
इतर बातम्या