Advertisement

डॉक्टरांना कामाचे दिवस जास्त आणि क्वारंटाईनसाठी फक्त एक दिवस

पालिकेच्या रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांनी या धोरणावर कडक टीका केली आहे.

डॉक्टरांना कामाचे दिवस जास्त आणि क्वारंटाईनसाठी फक्त एक दिवस
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिके (BMC)नं डॉक्टरांना क्वारंटाईन ठेवण्याच्या नियमात वारंवार बदल केले आहेत. ७ सप्टेंबर रोजी नवे परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे. यानुसार, कोरोनाव्हायरसशी लढा देणाऱ्या डॉक्टरांना फक्त एक दिवस क्वारंटाईन करण्यात येईल. त्यानंतर ते पुन्हा कामावर रुजू होऊ शकतात.

पण पालिकेच्या रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांनी या धोरणावर कडक टीका केली आहे. ते म्हणाले की, एक दिवसाचा क्वारंटाईन करण्याचा कालावधी खूपच कमी आहे. यामुळे रूग्ण किंवा त्यांच्याशी संवाद साधणार्‍या इतर लोकांना व्हायरस पसरण्याचा धोका जास्त असू शकतो.

पालिकेनं डॉक्टरांना पुन्हा रुजू झाल्यावर कोव्हीड नसलेल्या वॉर्डात त्यांचे कर्तव्य बजावण्यास सांगितलं होतं. या वॉर्डाट बहुतेक रूग्ण असतात ज्यांना इतर आजारांमुळे दाखल केलं जातं. नायर हॉस्पिटलसारख्या संस्थांमध्ये डॉक्टरांना सात दिवस काम करण्याची परवानगी असून नंतर एक दिवस क्वारंटाईन करण्यासाठी सुटी दिली जाते. तर केईएम आणि सायनसारख्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांना सुट्टीच्या आधी १० दिवस काम करण्यास सांगत आहेत.

यावर्षी मार्चमध्ये, पालिकेनं आपल्या डॉक्टरांना सात दिवस काम करण्यास सांगितलं आणि क्वारंटाईनसाठी सात दिवसांची सुट्टी घेण्यास सांगितलं. तथापि, त्यानंतर हे जूनमध्ये पाच दिवस काम आणि दोन दिवस सुट्टी घेण्यास सांगितलं. त्याच महिन्यात पुन्हा नऊ दिवस कामाचे आणि सहा दिवस सुट्टी असं ठरवण्यात आलं. या नियमांमध्ये वारंवार बदल करण्यात आले.

डॉक्टरांना भेडसावणाऱ्या जोखमींबद्दल, आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की, केईएममधील ११७ पेक्षा कमी निवासी डॉक्टरांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर सायन रुग्णालयात १२४ आणि नायर रुग्णालयात ११० डॉक्टरांची पॉझिटिव्ह चाचणी आली आहे.

केईएम हॉस्पिटलमधील रहिवासी डॉक्टर म्हणाले, “जेव्हा आम्ही एका दिवसाच्या सुटकेनंतर कोविड ड्यूटी वरून नॉन-कोविड ड्यूटीकडे वळतो तेव्हा आमच्यामुळे इतरांचाही जीव धोक्यात येतो."

या रुग्णालयांमध्ये काम करणार्‍या परिचारिकांची परिस्थिती आणखी वाईट असल्याचं दिसून येतंय. नायर इस्पितळातील एका परिचारिकानं सांगितलं की, त्यांना सुट्टी मंजूर होण्यापूर्वी एका वेळी १५ दिवसांपर्यंत काम करण्यास सांगितलं जातं.

दरम्यान, महापालिकेनं डॉक्टरांच्या धोरणांमधील बदलाचं औचित्य सिद्ध केलं आहे. महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, “यापूर्वी आम्हाला संसर्गाबद्दल फारशी माहिती नव्हती म्हणून आम्ही सात दिवस काम आणि सात दिवसांचा क्वारंटाईन ठेवण्याची परवानगी दिली. आता त्यापासून संरक्षण कसे करावं हे आम्हाला माहिती असल्यानं आम्ही क्वारंटाईनचे दिवस कमी केले आहेत.”

केईएम इथं निवासी डॉक्टरांनी दिलेला डेटा एक वेगळी गोष्ट सांगतो. त्यांनी नमूद केलं की, डॉक्टरांमध्ये संसर्ग होण्याची कमाल संख्या सप्टेंबरमध्ये नोंदली गेली होती जेव्हा बहुधा त्यांना क्वारंटाईन ठेवण्याचे दिवस कमी केले होते.



हेही वाचा

कोव्हीशिल्ड लशीच्या चाचणीसाठी मुंबईतून ४३ स्वयंसेवकांची निवड

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी २३४ नवीन कोरोना रुग्ण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा