Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी २३४ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी (०१ ऑक्टोबर) २३४ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २८४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी २३४ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी (०१ ऑक्टोबर) २३४ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २८४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर ६ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये पनवेलमधील ३, कामोठ्यातील २ तसेच कळंबोली येथील एका रूग्णाचा समावेश आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील २१, नवीन पनवेल २६, खांदा काॅलनी २८, कळंबोली ३८, कामोठे ५६, खारघर ६२, तळोजा येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ४२,   नवीन पनवेल ५२, कळंबोली ३५, कामोठे ६८, खारघर ८२,  तळोजा येथील ५ रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १९४९१ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १७२५४ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ४३२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १८०५ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. हेही वाचा -  

‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबईत आले १.१७ लाख प्रवासी

विक्रोळीत १० हेक्टर क्षेत्रावर कांदळवन लागवडRead this story in हिंदी
संबंधित विषय