Advertisement

विक्रोळीत १० हेक्टर क्षेत्रावर कांदळवन लागवड

‘युनायटेड वेस्टर्न कंपनी’ सोबत मुंबईच्या विक्रोळीमध्ये १० हेक्टर क्षेत्रावर कांदळवन लागवडीसाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.

विक्रोळीत १० हेक्टर क्षेत्रावर कांदळवन लागवड
SHARES

‘युनायटेड वेस्टर्न कंपनी’ सोबत मुंबईच्या विक्रोळीमध्ये १० हेक्टर क्षेत्रावर कांदळवन लागवडीसाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या लागवडीसाठी ३३ लाख रुपये कंपनीकडून आणि ४ लाख रुपये ‘मॅंग्रोव्ह फाऊंडेशन’कडून देण्यात येणार आहेत. (united western company will develop wetland mangrove at vikhroli mumbai)

यावेळी महाराष्ट्र कांदळवन प्रतिष्ठानच्या अधिकृत संकेतस्थळाचं उद्घाटन वनमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आलं. महाराष्ट्र सुरक्षा बलामार्फत कांदळवनाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक घेतले आहेत. त्यापैकी कर्तव्यावर असताना तुषार आव्हाड या सुरक्षा रक्षकाचा २२ सप्टेंबर २०२० रोजी  कोविड-१९ मुळे मृत्यू झाला. या गार्डच्या कुटुंबियांना २ लाखाची तत्काळ मदत वनमंत्र्यांनी कांदळवन फाऊंडेशनच्या निधीतून देण्यात येणार असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं.

हेही वाचा - आमीर खानच्या पाणी फाऊंडेशननं 'या' गावात उभारलं जंगल

कांदळवन निसर्ग उद्यान, दहिसर इथं नियोजित असून त्याबाबतचं सादरीकरणही यावेळी करण्यात आलं. वडाळा येथील नियोजित कांदळवन कक्ष कार्यालय तसंच वन विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी विश्राम गृह व समिती कक्ष बाबतही सादरीकरण करण्यात आलं.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कामे डिसेंबर २०२० अखेर पूर्ण करावी, असे निर्देश देखील वनमंत्री संजय राठोड यांनी दिले.

यावेळी प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे, सह सचिव गजेंद्र नरवणे, कांदळवन कक्षा’चे अपर प्रधान मुख्य वनसरक्षक वीरेंद्र तिवारी, उपवनसंरक्षक निनू सोमराज, विभागीय वन अधिकारी डी.आर पाटील यांच्यासह व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्याचे वनबल प्रमुख डॉ. एन.रामबाबू, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा - आरेतील ८०० एकर जागेत होणार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार

 
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा