Advertisement

आरेतील ८०० एकर जागेत होणार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यानंतर राज्याच्या वनविभागाने मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावात २०० एकर आणखी जमीन जोडली आहे.

आरेतील ८०० एकर जागेत होणार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार
SHARES

संजय गांधी नॅशनल पार्क (एसजीएनपी) चा आता विस्तार होणार आहे.  नॅशनल पार्कला आरेमध्ये ८०० एकर जमीन मिळणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यानंतर राज्याच्या वनविभागाने मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावात २०० एकर आणखी जमीन जोडली आहे. 

आता नॅशनल पार्कमध्ये ८०० एकर जंगल वाढणार आहे. यामुळे नॅशनल पार्कचे एकूण क्षेत्रफळ १०६ चौरस किलोमीटर होईल. आरे जंगलात राहणाऱ्या प्राण्यांसाठी अधिक क्षेत्र असेल. आरेमध्ये जवळपास ४० बिबट्या आहेत. नॅशनल पार्कचे संचालक जी मल्लिकार्जुन यांनी म्हणाले की, आरक्षित वन घोषित होण्यापूर्वी ही जमीन महसूल विभागाकडून घेतली जाईल. महसूल नोंदीनुसार गोरेगाव, आरे आणि मरोळ मरोसी या गावात ८०० एकरवर ही जमीन  पसरली जाईल.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या जमिनीवर मेट्रो 3 कार शेडच्या जागेचा समावेश होणार नाही. सूचना आणि हरकतींच्या प्रक्रियेस नऊ महिने लागतील. येथे बर्‍याच आदिवासी वस्त्या आहेत आणि त्यांचा जंगलावर वारसा हक्क आहे. वनमंत्री सुनील केदार म्हणाले की,  जवळपास ५० एकर जमीन आरक्षित क्षेत्राच्या बाहेर राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे. 



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा