Advertisement

आमीर खानच्या पाणी फाऊंडेशननं 'या' गावात उभारलं जंगल

दोन वर्षांनंतर सप्टेंबर 2020 हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला.

आमीर खानच्या पाणी फाऊंडेशननं 'या' गावात उभारलं जंगल
SHARES

बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या (Aamir Khan Video) पाणी फाउंडेशननं साताऱ्या जिल्ह्यातील न्हावी बुद्रुक या गावात गावकऱ्यांच्या मदतीनं २००० झाडं लावली. सप्टेंबर २०१८ मध्ये जपानी संशोधक अकीरा मियावाकी यांच्याकडून प्रेरणा घेत सायट्रीस पर्यावरण ट्रस्टसोबत मिळून त्यानं ही वृक्षलागवड केली. दोन वर्षांनंतर सप्टेंबर 2020 हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला.

आमिर खान (Aamir Khan) यानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आमिर खान आपल्या पाणी फाऊंडेशनद्वारा (Paani Foundation) केलेल्या कामाबाबत आनंद व्यक्त करीत असताना दिसत आहे.

आमिरनं (Aamir Khan Instagram) हा अत्यंत सुंदर असा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानं पोस्टवर लिहिलं आहे की, आमिर खान, किरण राव आणि संपूर्ण पाणी फाऊंडेशनची टीम गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि त्याच्या जवळील जलसंरक्षणाची कामं करीत आहोत. माणसांच्या प्रयत्नांमुळेच या पडीक जमिनीवर आज हिरवंगार जंगल उभं राहिलं आहे.



हेही वाचा

कंगनाचं ‘ते’ वक्तव्य चुकीचंच, उच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल

मुंबईतील यशवंत नाट्य संकुलाला लवकरच मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा