Advertisement

‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबईत आले १.१७ लाख प्रवासी

वंदेभारत अभियानांतर्गत मुंबई विमानतळावर बुधवार ३० सप्टेंबरपर्यंत १०४५ विमानांनी १ लाख १७ हजार ४३३ प्रवासी विविध देशांतून मुंबईत दाखल झाले आहेत.

‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबईत आले १.१७ लाख प्रवासी
SHARES

वंदेभारत अभियानांतर्गत मुंबई विमानतळावर बुधवार ३० सप्टेंबरपर्यंत १०४५ विमानांनी १ लाख १७ हजार ४३३ प्रवासी विविध देशांतून मुंबईत दाखल झाले आहेत. संपूर्ण शासकीय यंत्रणा कोरोना निर्मूलनासाठी निग्रहाने लढत असताना परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना मुंबईत उतरवून घेण्याचं व त्यांना क्वारंटाईन करण्याचं काम महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात येत आहे. (more than 1 lakh commuters arrived in mumbai airport through vande bharat mission)

अभियानांतर्गत ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत आणखी २०९ विमानांनी प्रवासी मुंबईत येणं अपेक्षित आहे.आलेल्या एकूण प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या ३८ हजार ६०२, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ३७ हजार २०१ आणि इतर राज्यांमधील प्रवाशांची संख्या ४१ हजार ६३० इतकी आहे.

‘या’ देशातून आले प्रवासी

मुंबई विमानतळावर आलेले प्रवासी हे विविध देशांमधून आले असून यामध्ये ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग,  कझाकिस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हिएतनाम, इटली, स्वीडन, इथिओपिया, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्ट इंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड,सौदी अरेबिया, कॅनडा, पूर्व आफ्रिका, फ्रान्स, नैरोबी, जॉर्जिया, कामेरून, युनायटेड अरब अमिराती, कांगो, सिरा लिओन, लिओन या देशांचा समावेश आहे.

हेही वाचा- मुंबई-पुणे मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस?

बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन ची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आलेली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे. त्यांना तेथील जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त यांच्यामार्फत क्वारंटाईन  करण्याची व्यवस्था केली जात आहे.

महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन विभागाच्या २४ मे २०२० रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना उतरवून घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलं जात असून संबंधित राज्यांकडून त्यांचे पासेस येताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे.

वंदेभारत अभियानातील कामकाज हे जिल्हाधिकारी कार्यालय, उपनगर, बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बेस्ट, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ यांच्या समन्वयातून केलं जात आहे.

वंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.

हेही वाचा- ‘वंदे भारत’ अभियानांतर्गत मुंबईत ५४ हजार ७०७ प्रवाशांचं आगमन

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा