Advertisement

मुंबई-पुणे मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस?

रेल्वे प्रशासनानं सुरू केलेल्या वंदे भारत एक्स्प्रेस या हायस्पीड गाडीमुळं नवी दिल्ली ते वाराणसी मार्गादरम्यानचा वेळ ४० टक्क्यांनी घटला आहे. ही एक्स्प्रेस देशातील अन्य मार्गावर सुरू करण्याच्यादृष्टीनं रेल्वेकडून चाचपणी करण्यात येत आहे.

मुंबई-पुणे मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस?
SHARES

रेल्वे प्रशासनानं सुरू केलेल्या वंदे भारत एक्स्प्रेस या हायस्पीड गाडीमुळं नवी दिल्ली ते वाराणसी मार्गादरम्यानचा वेळ ४० टक्क्यांनी घटला आहे. ही एक्स्प्रेस देशातील अन्य मार्गावर सुरू करण्याच्यादृष्टीनं रेल्वेकडून चाचपणी करण्यात येत आहे. त्यात मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक आणि मुंबई-बडोदा मार्गाचाही समावेश होऊ शकतो.

मेमू गाडीची चाचणी

मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक आणि मुंबई-बडोदा या मार्गावरील वेग वाढवण्यासाठी पुढील आठवड्यापासून मेमू गाडीची चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर 'वंदे भारत' एक्स्प्रेसच्या धर्तीवर डब्यांची निर्मिती करून मेमू गाड्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंडळ सदस्य (रोलिंग स्टॉक) राजेश अग्रवाल यांनी दिली.

अंतिम निर्णय नाही

कुर्ला येथील मध्य रेल्वेच्या कारशेडमध्ये बुधवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत 'सेमी स्पीडच्या ‘वंदे भारत’ लोकलची चाचणी ही पुढील आठवड्यात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर घेण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. या दोन्ही मार्गावर एक एसी आणि एक मेमू वंदे भारत लोकलची चाचणी घेण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक या दरम्यान चाचणी घेत असताना ती यशस्वी झाल्यास, या शहरांत पोहोचण्यासाठी २ तासांपेक्षा कमी वेळ लागणार आहे. या संदर्भात अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नसून, आमच्या वतीनं केवळ शक्यता वर्तविली जात आहे', असं अग्रवाल यांनी सांगितलं.

सध्या मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक अंतरासाठी ३ ते साडेतीन तास लागतात. तर मुंबई-बडोदा हे अंतर कापण्यासाठी रेल्वेला ६ तासांचा वेळ लागतो. त्याशिवाय, पुणे-नाशिक दरम्यान घाट मार्ग वगळता अन्य मार्गावर वेग वाढवून कमी वेळेचं लक्ष्य गाठणं शक्य आहे.



हेही वाचा -

गायीचं दूध २ रुपयांनी महागणार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा