Advertisement

कोव्हीशिल्ड लशीच्या चाचणीसाठी मुंबईतून ४३ स्वयंसेवकांची निवड

मुंबईत महापालिकेच्या नायर रुग्णालयात ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या चार पुरुष स्वयंसेवकांना या लसीचा पहिला डोस सोमवारी देण्यात आला.

कोव्हीशिल्ड लशीच्या चाचणीसाठी मुंबईतून ४३ स्वयंसेवकांची निवड
SHARES

ऑक्सफर्ड विद्यापीठ-सिरम इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या कोरोनावरील कोव्हीशिल्ड लशीची मुंबईत मानवी चाचणी सुरु झाली आहे. या चाचणीसाठी मुंबईतून ४३ स्वयंसेवकांची निवड केली असल्याचं मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलं आहे. यामधील १२ जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

मुंबईत महापालिकेच्या नायर रुग्णालयात ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या चार पुरुष स्वयंसेवकांना या लसीचा पहिला डोस सोमवारी देण्यात आला. याआधी शनिवारी केईएम रुग्णालयात ३ स्वयंसेवकांना लसीचा डोस देण्यात आला होता. लस दिलेल्या या स्वयंसेवकांना काही तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं. मात्र, कोणताही त्रास होत नसल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले. या स्वयंसेवकांना एका महिन्यानंतर लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. 

पुढील महिनाभरात राज्यात १०० स्वयंसेवकांवर तसेच भारतात विविध रुग्णालयातून १६०० स्वयंसेवकांवर या लशीचा प्रयोग करण्यात येणार आहे. कोव्हीशिल्ड लस चाचणी दरम्यान स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना १  कोटी रुपयांचा विमा नुकसान भरपाईच्या माध्यमातून मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या मदतीमुळे स्वयंसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.



हेही वाचा -

मुंबईतील 'इतक्या' इमारती टाळेबंदीतून मुक्त 

दिलासा! मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळणार वाढीव गुण



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा