Advertisement

मुंबईतील 'इतक्या' इमारती टाळेबंदीतून मुक्त


मुंबईतील 'इतक्या' इमारती टाळेबंदीतून मुक्त
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, असं असलं तरी पुन्हा कोरोनामुक्त रुग्णांचा अकड्यातही वाढ होत आहे. परिणामी टाळेबंद केलेल्या या इमारतींवरील निर्बंध उठविण्यात आले आहेत. मुंबईमधील तब्बल २८ हजार ९०० हून अधिक इमारतींमध्ये सापडलेले कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील काही दिवसांपासून मुंबईमधील ठिकठिकाणच्या इमारतींमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं इमारतींमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी पालिकेने संबंधित संपूर्ण इमारत टाळेबंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र एक-दोन रुग्ण सापडल्यानंतरही संपूर्ण इमारत टाळेबंद करण्यात येत होती. कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर परिस्थितीनुरूप संपूर्ण इमारत वा तिचा काही भाग टाळेबंद करण्याचा निर्णय घेतला. आता एखाद्या इमारतीत १० पेक्षा अधिक किंवा दोनपेक्षा अधिक मजल्यांवर कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास ती इमारत पूर्णपणे टाळेबंद करण्यात येत आहे.

टाळेबंद केलेल्या इमारतींमधील रहिवाशांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्याची जबाबदारी इमारतीमधील सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर संसर्ग पसरू नये याची काळजी घेण्याच्या सूचनाही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. मागील काही दिवसांपासून मुंबईत दररोज २ हजारांहून अधिक व्यक्तींना कोरोनाची बाधा होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे टाळेबंद इमारतींची संख्याही वाढत आहे.

कोरोनाबाधित सापडल्याने सद्यस्थितीत तब्बल १०,२८९ इमारती टाळेबंद कराव्या लागल्या आहेत. मात्र कोरोनाबाधित सापडल्याने यापूर्वी टाळेबंद केलेल्या २८,९७६ इमारतींनी टाळेबंदीचा काळ पूर्ण केला असून तेथे नवे रुग्ण आढळून आले नाहीत. त्यामुळे या इमारती टाळेमुक्त झाल्या आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा