पेट्रोल पंपावरील शौचालय होणार 'सार्वजनिक'

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महापालिकेने 'माझी मुंबई, स्वच्छ मुंबई'चा कितीही दावा केला, तरी प्रत्यक्षातील चित्र वेगळंच आहे. त्यामागचं प्रमुख कारण आहे पायाभूत सुविधांचा अभाव. त्यातही प्रवास करताना प्रामुख्याने भेडसावणारी गोष्ट म्हणजे 'आपात्कालीन' स्थितीत सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहांची जाणवणारी कमतरता. या समस्येवर मात करण्यासाठी महापालिकेने शहरातील पेट्रोल पंपाचा खुबीने वापर करण्याची शक्कल लढवली आहे.

पेट्रोल पंप मालकांना पत्र

मुंबई महापालिकेने सर्व वाॅर्ड अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रामध्ये सर्व पेट्रोल पंप मालकांनी सर्वसामान्य जनतेला पेट्रोल पंपातलं शौचालय मोफत उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. हे पत्र पेट्रोल पंप मालकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी वाॅर्ड अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.

मुंबईत किती पेट्रोल पंप?

सद्यस्थितीत मुंबईभरात एकूण ४२३ पेट्रोल पंप आहेत. तर पूर्ण राज्यात ४ हजार ७०० हून अधिक पेट्रोल पंप आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मुंबईत स्वच्छता उपक्रम राबवण्यासाठी महापालिकेने सर्व पेट्रोल पंप मालकांची मदत घेण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार महापालिकेने मुंबईतील सर्व वाॅर्ड अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

स्वच्छताही हवी

स्वच्छतागृह उपलब्ध करून देतानाच त्याच्या स्वच्छतेची काळजी घेण्याची जबाबदारी निश्चित करण्याची सूचनाही महापालिकेने वाॅर्ड अधिकाऱ्यांना दिली आहे.


हेही वाचा-

मनसोक्त प्या! ख्रिसमस, थर्टी फर्स्टला हाॅटेल, बार पहाटेपर्यंत खुले

मालाडचा शांताराम तलावाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर, शिवसेनेचा भाजपाला झटका


पुढील बातमी
इतर बातम्या