दिव्यांगांना पालिका इलेक्ट्रिक सायकल पुरवणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रिक सायकल खरेदी करण्यास मदत करेल. याशिवाय, दिव्यांगांना गरिबी निर्मूलनासाठी राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्याचीही प्रशासकिय संस्था योजना आखत आहे.

इलेक्ट्रिक सायकलच्या मदतीनं ते थंड पेये, भाजीपाला, बिस्किटे, वडा पाव विकणे यासारखे छोटे व्यवसाय सुरू करू शकतात, असं नियोजन विभागातील एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

दिव्यांगांना ई-सायकल खरेदीसाठी थेट बँक हस्तांतरणाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. ४० टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्व असलेल्यांना या योजनेत समाविष्ट केले जाईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी, लाभार्थी हे मुंबईचे रहिवासी असावेत आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा जास्त नसावे.

याशिवाय, गर्दीच्या भागात जलद प्रतिसाद आणि सुलभ प्रवेशासाठी, मुंबई अग्निशमन दल शहरात अग्निशमनासाठी २४ फायर बाईक मिळवणार आहेत. ३.२५ कोटींचा प्रस्ताव बुधवार, २७ ऑक्टोबर रोजी मंजुरीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) स्थायी समितीसमोर ठेवला जाईल.


हेही वाचा

कोस्टल रोड प्रकल्पामुळे टाटा गार्डनमधील झाडांवर हातोडा

अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी खाजगी रुग्णालयात?

पुढील बातमी
इतर बातम्या