Advertisement

अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी खाजगी रुग्णालयात?

२०१५ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या समितीनं केलेल्या शिफारशींनुसार हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी खाजगी रुग्णालयात?
SHARES

मुंबई अग्निशमन दल पुढील ३ वर्षांसाठी अग्निशमन दलाच्या नियमित वार्षिक आरोग्य तपासणीसाठी २.२२ कोटी खर्च करण्यास तयार आहे. त्यासाठी त्यांनी एक खाजगी एजन्सी आधीच ठरवली आहे. एजन्सी ३५ वर्षांवरील अधिकारी आणि अग्निशमन कर्मचार्‍यांसह २००० कर्मचारी सदस्यांची आरोग्य तपासणी करेल.

या योजनेसाठी मेसर्स अपोलो क्लिनिकशी करार केला जाईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यानं सांगितलं. ते २०२१-२०२३ पर्यंत वर्षातून एकदा १६ प्रकारच्या चाचण्या घेतील. उद्या, २४ नोव्हेंबरला हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला जाणार आहे.

२०१५ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या समितीनं केलेल्या शिफारशींनुसार हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. समितीच्या निष्कर्षानुसार, कामाचा ताण आणि कामाचा जास्त बोजा यामुळे अनेक अग्निशमन कर्मचाऱ्यांची तब्येत खराब असल्याचं आढळून आलं आहे.

या चाचण्या २०१५ मध्ये केईएम, नायर, सायन आणि कूपर हॉस्पिटल सारख्या पालिका संचालित रुग्णालयांमध्ये केल्या गेल्या. तथापि, या रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्णांच्या गर्दीमुळे चाचण्यांना विलंब झाला.

२०१६ मध्ये, अग्निशमन दलानं एका खाजगी एजन्सीमध्ये काम केलं ज्याचा करार या वर्षी संपत आहे. पालिका रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांनी वेळ आणि पैशाची बचत केल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं.

चाचण्यांमध्ये हिमोग्राम, रक्तातील साखर, लिपिड प्रोफाइल, कार्डियाक प्रोफाइल, डोळ्यांची तपासणी आणि छातीचा एक्स-रे यांचा समावेश असेल. विभाग २०२१ आणि २०२२ च्या तपासणीसाठी प्रति व्यक्ती ३,६०० रुपये देतील. तर २०२३ मध्ये ते प्रति व्यक्ती ३,९०० रुपये देतील.



हेही वाचा

मुंबईतील 'हे' परिसर होणार पूरमुक्त; माहुल पंपिंग स्टेशन प्रकल्प लागणार मार्गी

मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, चिकनगुनियाची रुग्ण संख्या तिप्पट

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा