Advertisement

मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, चिकनगुनियाची रुग्ण संख्या तिप्पट

मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे.

मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, चिकनगुनियाची रुग्ण संख्या तिप्पट
SHARES

मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. गेल्या २१ दिवसांत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोच्या रुग्ण संख्येत दुपटीनं वाढ झाली असून, १ ते २१ नोव्हेंबर दरम्यान मलेरियाचे २३४, डेंग्यूचे ९१, गॅस्ट्रोचे २००, चिकनगुनीयाचे १२ आणि लेप्टोचे ६ रुग्ण आढळले असल्याची माहिती समोर येत आहे.

एकीकडं मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोचा धोका कायम आहे, तर दुसरीकडं गेल्या दीड वर्षापासून मुंबईकर कोरोना विरोधात लढा देत आहेत. प्रभावी उपचार पद्धती, नियमांची कडक अंमलबजावणी आदी उपाययोजनांमुळं कोरोनाची पहिल्या व दुसऱ्या लाटेला थोपवण्यात व  तिसरी लाट येण्यापूर्वीच परतवण्यात पालिकेला यश आले आहे.

तरीही अद्याप कोरोनाचे संकट टळलेले नाही. त्यामुळं कोरोनाच्या नियमांचं पालन करणं सर्वांनाच बंधनकारक आहे. सध्या कोरोना नियंत्रणात असला तरी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचे संकट कायम आहे. त्यामुळं कोरोनाला हरवण्यासाठी ज्या पद्धतीनं खबरदारी घेतली त्याचप्रमाणे साथीच्या आजार रोखण्यासाठी काळजी घ्यावी, तसंच पाणी गाळून आणि उकळून प्यावं असं आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागानं केलं आहे.

१ ते २१ नोव्हेंबरपर्यंतची रुग्ण संख्या

  • मलेरिया - २३४
  • डेंग्यू  - ९१
  • गॅस्ट्रो - २००
  • कावीळ - २४
  • चिकनगुनीया - १२
  • लेप्टो - ६
  • स्वाईन फ्ल्यू - १
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा