Advertisement

मुंबईतील 'हे' परिसर होणार पूरमुक्त; माहुल पंपिंग स्टेशन प्रकल्प लागणार मार्गी

मुंबईतील अनेक परिसरात मुसळधार पाऊस पडल्यास संबधिक परिसर जलमय होतो. रस्ते जलमय झाल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते.

मुंबईतील 'हे' परिसर होणार पूरमुक्त; माहुल पंपिंग स्टेशन प्रकल्प लागणार मार्गी
SHARES

मुंबईतील अनेक परिसरात मुसळधार पाऊस पडल्यास संबधिक परिसर जलमय होतो. रस्ते जलमय झाल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळं प्रवाशांना तात्काळ वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय चाकरमान्यांनाही आपला जीव धोक्यात घालून पाण्यातून वाट काढावी लागते. त्यामुळं दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेनं माहुल पंपिंग स्टेशन प्रकल्प हाती घेतला आहे. या पंपिंग स्टेशनमुळे किंग्ज सर्कल, गांधी मार्केट, नेहरूनगर, सिंधी सोसायटी चेंबूर आणि रेल्वे मार्ग पूरमुक्त होण्यास मदत होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जागा मिळत नसल्यानं वेटिंगवर असलेला पालिकेचा पूरमुक्तीचा महत्त्वाकांक्षी माहुल पंपिंग स्टेशन प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. या पंपिंग स्टेशनसाठी पालिकेला आपली जागा देऊन प्रकल्पासाठी आवश्यक असणारी १५,५०० चौरस मीटर जागा मिळणार आहे.

मुंबईत अतिवृष्टीत सखल भागांत पाणी साचण्याचे प्रकार वारंवार घडतात. यातच गेल्या काही वर्षांपासून पावसाची तीक्रता आणि अनिश्चितात वाढल्यानं व कमी वेळात अतिवृष्टी होण्याचे प्रकार वाढल्यानं सखल भागांसह रेल्वे रुळांवर पाणी साचण्याचे प्रकार घडल्याने जनजीवन विस्कळीत होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे महापालिकेनं २००६ मध्ये ब्रिमस्ट्रोवॅड उपक्रमांतर्गत इतर उपाययोजनांसोबतच आतापर्यंत हाजी अली, रे रोड, वरळी लव्हग्रोव्ह, क्लिव्हलॅण्ड, जुहू इर्ला आणि खार येथील गझदरबंद या ठिकाणी सहा पंपिंग स्टेशन उभारली आहेत. यामध्ये सेकंदाला हजारो लिटर पाणी समुद्रात फेकणे शक्य होत आहे.

या पार्श्वभूमीवर प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) खाते मागील अनेक वर्षांपासून माहुल पंपिंग स्टेशन बांधण्याकरिता केंद्र सरकारच्या सॉल्ट कमिशनर खात्याकडे जागा मिळवण्याकरिता पाठपुरावा करीत होते. मात्र याला यश आले नाही. मात्र माहुल पंपिंग स्टेशन उभारणे ही तातडीची गरज असल्यामुळे पालिकेने आता जागेच्या बदल्यात जागा मिळवून प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. या जागा अदलाबदलीचा प्रस्ताव आगामी सुधार समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.

माहुल पंपिंग स्टेशनची निकड लक्षात घेता प्रमुख अभियंता (पर्जन्य जल वाहिन्या) यांनी मौजे आणिक न.भू.क्र. 1अ/11, 1अ/12 या दोन भूखंडांमधील १५,५०० चौरस मीटर जागा पालिकेच्या ताब्यात घेऊन महानगरपालिकेच्या भूखंड न.भू.क्र. 1अ/14 मधील 15,500 जागा मे. अजमेरा रिऑलिटी ऍण्ड इफ्रास्ट्रक्चर इंडिया यांना प्रदान करण्यात येणार आहे. याबाबत कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात आल्या असून पालिका आयुक्तांनीही याला मंजुरी दिली आहे.

पंपिंग स्टेशनसाठी निवडण्यात येणारी जागा अतिक्रमणमुक्त आहे. तसेस केंद्र सरकारच्या सीआरझेड-आयबी अंतर्गत असलेल्या तरतुदीनुसार वन व पर्यावरण खात्याची परवानगी मिळणे सुलभ आहे. ही जागा नाल्यालगत असल्यानं पाणी वाहून नेण्यासाठी वेगळी व्यवस्था करावी लागणार नाही. ही जागा पूर्व मुक्त मार्गावरून जाण्यायोग्य असल्यानं पाहणी-मेंटेनन्ससाठी योग्य. या पंपिंग स्टेशनमुळे माहुल खाडीची रुंदी 56 मीटरपर्यंत वाढेल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा