कर थकवणाऱ्यांवर पालिका करणार कारवाई

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महापालिकेचा कर थकवणाऱ्यांवर पालिकेनं आता कारवाईचा बडगा उगारला आहे. कर थकवणाऱ्या २५ जणांच्या मालमत्तेवर जप्तीची आणि 25 मालमत्तांचे पाणी पालिकेकडून बंद केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

मालमत्ता करात घसरण

दोन वर्षांपूर्वी पालिकेनं जकात कर रद्द केल्यानंतर मालमत्तेचा कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत झाला. त्यानुसार 90 दिवसांच्या कालावधीत मालमत्ताकर भरणं आवश्यक असतं. तरीही कर न भरल्यास २१ दिवसांची अंतिम नोटीस दिली जाते. नोटीस देऊनही मालमत्ता कर न भरल्यास त्या संबधित मालमत्तेवर पालिका कारवाई करते. मात्र अनेक बड्या विकासकांनी कित्येक कोटींचा मालमत्ता करत अद्याप भरलेला नाही. जकात कर रद्द झाल्यानंतर 2017-18 मध्ये 5132 कोटी रुपये पालिकेला महसूल मिळाला. मात्र 2018-19 वर्षात जमा होणाऱ्या मालमत्ता करता दोन हजारांनी घसरण झाली. या वर्षात  मालमत्ता कर 3 हजार 495 कोटी इतकाच जमा झाला आहे. 

कोणत्या कंपन्यांचा समावेश?

यंदाच्या थकबाकीमध्ये अनेक बड्या कंपन्या आणि विकासकांची नावं आहेत. या यादीत भारत टिम्बर काँर्पोरेशन, रॉयल पाम्स, नॅशनल स्पोर्ट्स क्लब, अमीर पार्क्स अँम्झुझमेंट प्रा. लि., सनशाईन बिल्डर्स,  एचडीआयएल,  बॉम्बे डाइंग कंपनी, विधी रिएल्टर्स, वसुंधरा डेव्हलपर्स, सनशाईन हाऊस किपींग इन्फ्रा, रघुलिला मेघा मॉल, कांती डेव्हलपर्स, आदींचा समोवेश आहे. या कंपन्यांच्या मालमत्तेवर कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती कर निर्धारण आणि संकलन खात्यानं दिली.   


हेही वाचा

मुंबई पोलिसांचं मिशन 'पोट आवरा'

पुढील बातमी
इतर बातम्या