Advertisement

मुंबई पोलिसांचं मिशन 'पोट आवरा'

वाढलेलं पोट नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना नायगाव मुख्यालयात महिनाभर मार्गदर्शन दिलं जात आहे.

मुंबई पोलिसांचं मिशन 'पोट आवरा'
SHARES

ड्युटीची अनिश्चित वेळवेळी-अवेळी आणि बाहेरचे ‘खाणे’ यामुळे मुंबई पोलिसांची वाढलेली पोटं हा कधी थट्टेचा तर कधी चिंतेचा विषय म्हणून चर्चिला जातोहृदयव‌किार, उच्च रक्तदाब यांसारख्या कुरबुरींनी वेढलेल्या पोलिसांच्या पोटाची मात्र आरोग्यस्थिती समोर येत नव्हती

मात्र वाढलेलं पोट नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना नायगाव मुख्यालयात महिनाभर मार्गदर्शन दिलं जात आहेया मार्गदर्शन शिबिरात पोलिसांच्या जीवनशैलीमुळे कुठले पोटाचे विकार होऊ शकतात आणि त्याच्या प्रतिबंधासाठी काय करावे, यासोबतच पोलिसांना व्यायामही शिकवला जाणार आहे.  

स्वस्थ पोलीस, सशक्त पोलीस’

पोलिसांच्या कामाच्या तासांमुळे त्यांना हृदयव‌किार, उच्च रक्तदाब, हाडांचे विकार झाल्याची अनेक उदाहरणे पुढे आली आहेत. पण, जेवणाच्या अनियमित वेळा, जंकफूडचं सेवन, कमी पाणी पिणं यामुळे पोलिसांना सदैव पोटदुखी, अॅसिडिटीला सामोरं जावं लागतं. या दुखण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास त्याची परिणती गंभीर आजारातही होऊ शकते. त्यामुळेच मुंबई पोलीस आयुक्त सुबोधकुमार जैयसवाल यांनी ‘स्वस्थ पोलीस, सशक्त पोलीस’ ही संकल्पना राबवण्याचं ठरवलं.

एक महिना चालणार शिबीर

जैयस्वाल यांनी पोट वाढलेल्या १५० जणांची निवड केली आहे. या पोलिस कर्मचाऱ्यांना फिट राहण्यासाठी आणि पोट नियंत्रणात ठेवण्यासाठी नेमकं काय करायला हवे? यासाठी तज्ञाच्या मदतीनं मार्गदर्शन आणि व्यायामाचे धडे दिले जाणार आहेत. एक महिना हे शिबीर चालणार आहे. यात आहार तज्ज्ञ, योगा तज्ज्ञ आणि प्रोत्साहन देण्यासाठी मोटीव्हेशनल स्पेशलिस्ट असणार आहेत. १५० पोलिसांचा आहार, व्यायाम याची जबाबदारी रुजुता दिवेकर यांच्या टीमवर सोपवण्यात आली आहे.  

नायगाव पोलिस मुख्यालय 1 फेब्रुवारीपासून या पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. सकाळी 7 ते रात्री 9.30 या वेळेत म्हणजेच 14 तास प्रशिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा