अंधेरी सबवेत पाणी साचू नये म्हणून पालिका नाल्यांचे रुंदीकरण करणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मंगळवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने अंधेरीतील वाहतूक विस्कळीत झाली होती. पावसाळ्यात अंधेरीच्या सब वे त पाणी भरण्याची समस्या काही नवीन नाही. दरवर्षी पावसाळ्यात अंधेरी सबवे बंद करण्याची वेळ येते. याच समस्येवर पालिकेनं तोडगा काढला आहे.

BMC ने अंधेरी पश्चिमेतील नाल्यांचे रुंदीकरण करण्यासाठी 100 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प हाती घेतला आहे, जो पूर्ण होण्यासाठी 18 महिने लागतील.

2005 मध्ये आलेल्या पुरानंतर, पूर टाळण्यासाठी पालिकेने आठ ठिकाणी पंपिंग स्टेशन बांधले. त्यानुसार मोगरा नाल्याच्या पंपिंग स्टेशनमुळे पावसाळ्यात पाणी तुंबणाऱ्या अंधेरी, वर्सोवा, जोगेश्वरी आणि ओशिवरा सारख्या भागात दिलासा मिळाला असता. तेथे पंपिंग स्टेशन बांधले जाणार होते, परंतु अद्यापपर्यंत त्याची योग्य अंमलबजावणी झालेली नाही.

मंगळवारी रात्री मुंबईत तीन आठवड्यांतील सर्वात जास्त पाऊस झाला. सांताक्रूझ येथील भारतीय हवामान विभाग (IMD) हवामान केंद्राने गेल्या 24 तासांत 123.6 मिमी पावसाची नोंद केली.

दरम्यान, अरबी समुद्रात भोवरा तयार झाल्यामुळे दक्षिण मुंबईपेक्षा शहराच्या उत्तर आणि मध्य भागात जास्त पाऊस झाला. कुलाबा येथील आयएमडीच्या हवामान केंद्रात केवळ ५५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.


हेही वाचा

कांदा पुन्हा रडवणार, कांदा उत्पादकांचं 'या' तारखेपासून आंदोलन

चुकीची पार्किंग कराल तर बसेल भुर्दंड, आकारला जाईल 'इतका' दंड

पुढील बातमी
इतर बातम्या