Advertisement

चुकीची पार्किंग कराल तर बसेल भुर्दंड, आकारला जाईल 'इतका' दंड

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

चुकीची पार्किंग कराल तर बसेल भुर्दंड, आकारला जाईल 'इतका' दंड
SHARES

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सरकार असा नियम आणण्याच्या तयारीत आहे, ज्या अंतर्गत रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने वाहन पार्क करणाऱ्यांना मोठा दंड भरावा लागेल.

एका कार्यक्रमात त्यांनी केलेली घोषणा ऐकून कार, बाईक आणि अन्य वाहनधारकांना मोठा धक्का बसला आहे. रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनाचे छायाचित्र कोणी पाठवल्यास त्याला 500 रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे ते म्हणाले. हा कायदा लवकरात लवकर आणण्याचा सरकारचा विचार आहे.

गडकरी यांनी घोषणा केल्यानंतर वाहन चालवणाऱ्यांकडून या नियमावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही लोक याला सरकारच्या उत्पन्नाचे स्रोत म्हणत आहेत. जो व्यक्ती आपले वाहन चुकीच्या पद्धतीने पार्क करेल त्याला यासाठी 1000 रुपये दंड भरावा लागेल. केंद्राने असा कायदा आणल्यानंतर रस्त्यावरील वाहतूककोंडी आणि अपघात कमी होतील, अशी या मागची कल्पना आहे.

गडकरी यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांची प्रवृत्ती रोखण्यासाठी असा कायदा करण्याचा विचार केला जात आहे. 'रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनाला एक हजार रुपये दंड होईल, असा कायदा मी आणणार आहे. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनाचे छायाचित्र पाठवणाऱ्याला 500रुपये दिले जातील.

लोक घरे बांधतात, पण पार्किंगसाठी जागा सोडत नाहीत, यावर केंद्रीय मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याऐवजी लोक आपली वाहने रस्त्यावरच पार्क करतात.

गडकरी म्हणाले, 'माझ्या नागपुरातील स्वयंपाकीकडे दोन सेकंड हँड वाहने आहेत. आज चार सदस्यांच्या कुटुंबाकडे सहा गाड्या आहेत. दिल्लीचे लोक नशीबवान आहेत असे वाटते. त्यांचे वाहन उभे करण्यासाठी आम्ही तशी व्यवस्था केली आहे.हेही वाचा

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील मेट्रो उशिरापर्यंत धावणार, जाणून घ्या टायमिंग

मुंबईकरांना बेस्टकडून अनोखं गिफ्ट, त्वरित तिकीट सेवा सुरू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा