Advertisement

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील मेट्रो उशिरापर्यंत धावणार, जाणून घ्या टायमिंग

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ या मार्गावरील मेट्रो आता उशिरापर्यंत धावणार आहे.

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील मेट्रो उशिरापर्यंत धावणार, जाणून घ्या टायमिंग
SHARES

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ या मार्गावरील मेट्रो आता उशिरापर्यंत धावणार आहे. शनिवारपासून (६ ऑगस्ट) शेवटची गाडी रात्री ११ वाजून ४४ मिनिटांत सुटणार आहे. तसेच वर्सोव्यावरून रात्री ११ वाजता सुटणारी शेवटची गाडी शनिवारपासून ११ वाजून १९ मिनिटांत सुटेल, अशी माहिती मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून (एमएमओपीएल) देण्यात आली.

कोरोना साथीमुळे मेट्रो सेवेचा कालावधी आणि फेऱ्या कमी करण्यात आल्या. हा संसर्ग कमी होऊ लागल्यानंतर ‘एमएमओपीएल’ने टप्प्याटप्प्याने वेळ आणि फेऱ्या वाढविल्या. या साथीचे सर्व निर्बंध हटल्यानंतर ही प्रवासी सेवा पूर्ववत झाली असून सकाळी साडेसहा ते रात्री १२ वाजून ७ मिनिटांपर्यंत सुरू राहणार आहे.

‘एमएमओपीएल’ने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवापर्यंत घाटकोपरवरून रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी शेवटची गाडी सुटत होती. मात्र शनिवारपासून रात्री ११ वाजून ४४ मिनिटांनी शेवटची गाडी सुटणार आहे. तसेच वर्सोव्यावरून रात्री ११ वाजता सुटणारी शेवटची गाडी रात्री ११ वाजून १९ मिनिटांत सुटणार आहे.

घाटकोपरवरून रात्री ११ वाजून ४४ मिनिटांत सुटणारी गाडी वर्सोवा स्थानकात रात्री १२ वाजून ७ मिनिटांनी पोहचणार आहे. मात्र त्याच वेळी सकाळच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आला नाही. वेळापत्रकानुसार वर्सोवा आणि घाटकोपरवरून सकाळी ६.३० वाजता पहिली गाडी सुटणार आहे.

दरम्यान, कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ या मार्गिकेवरील आठ डब्यांच्या पहिल्या मेट्रो गाडीचे चार डबे गेल्या आठवड्यात मंगळवारी पहाटे मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर आता उर्वरित चार डबे शुक्रवारी पहाटे मरोळ-मरोशी येथील तात्पुरत्या कारशेडमध्ये दाखल झाले. यामुळे या मार्गिकेवरील मेट्रो चाचणीचा मार्ग अखेर मोकळा झाला.

मेट्रो ३ चा सीप्झ ते बीकेसी हा पहिला टप्पा २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ‘एमएमआरसी’चे आहे. त्यासाठी सर्वप्रथम कारशेडचा प्रश्न मार्गी लावणे अत्यंत गरजेचे होते. त्यानुसार आरेत कारशेड बांधण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आला आहे. तर आता मेट्रो गाडीची चाचणीही करण्यात येणार आहे.



हेही वाचा

मुंबईकरांना बेस्टकडून अनोखं गिफ्ट, त्वरित तिकीट सेवा सुरू

विरार ते मीरा रोड मार्गावर मेट्रोची गरज, राजेंद्र गावितांची लोकसभेत मागणी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा