Advertisement

मुंबईकरांना बेस्टकडून अनोखं गिफ्ट, त्वरित तिकीट सेवा सुरू

बेस्टने तत्काळ तिकीट सेवा सुरू केली आहे.

मुंबईकरांना बेस्टकडून अनोखं गिफ्ट, त्वरित तिकीट सेवा सुरू
SHARES

मुंबईची (Mumbai) 'लाल परी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टनं (BEST) रविवारी आपली पंच्याहत्तरी साजरी केली. यानिमित्तानं बेस्टनं प्रवाशांसाठी एक नवी सेवा सुरु केली आहे. बेस्टनं प्रवाशांसाठी अनोखी 'चलो पे' सेवा (Chalo Pay Service) सुरू केली आहे.

या सेवेमुळे आता प्रवाशांना बसमध्ये चढण्यापूर्वीच मोबाईल तिकीट खरेदी करण्याची गरज भासणार नाही. ते कोणत्याही बसमध्ये चढू शकतात आणि त्यानंतर त्यांच्या मोबाइलवरून तिकिटाचे पैसे देऊ शकतात. त्यांनी पैसे भरताच त्यांचे मोबाईल तिकीट अॅपवर जनरेट होईल.

चलो अॅपवर उपलब्ध

बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र म्हणाले की, "ही भारतातील पहिली पब्लिक ट्रांसपोर्ट केंद्रित पेमेंट प्रणाली आहे. 'चलो पे' नावाची ही सुविधा बेस्ट चलो अॅपवर उपलब्ध आहे. ही ऑफलाइन पेमेंट प्रणाली आहे, ज्यामुळे अनेक प्रवाशांना फायदा होईल."

कसा वापर कराल?

लोकेश चंद्रा यांनी सांगितलं की, "प्रवासी UPI, नेट बँकिंग, डेबिट आणि क्रेडिट कार्ड आणि इतर ऑनलाइन पेमेंटचा वापर करून मोबाइल वॉलेट रिचार्ज करू शकतात आणि नंतर त्यांच्या बस तिकिटांसाठी त्वरित पेमेंट करण्यासाठी चले पे वॉलेटमधील पैसे वापरू शकतात. यासाठी प्रवाशांना बस कंडक्टरला कळवावं लागेल की, त्यांना मोबाईलमधील चलो पे वापरून पैसे भरायचे आहेत. त्यानंतर प्रवाशांना मोबाईलमधील चलो पे वरील स्कॅनरच्या मदतीनं कंडक्टरकडे असलेल्या मशीनवरील QR स्कॅन कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर काहीच मिनिटांत मोबाईल तिकीट अॅपवर जनरेट होईल.हेही वाचा

पश्चिम रेल्वे ८ ऑगस्टपासून अतिरिक्त आठ एसी गाड्या सुरू करणार

बेस्टच्या आगारांमध्ये वाहन उभे करण्यासाठी जागा आरक्षित करता येणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा