Advertisement

पश्चिम रेल्वे ८ ऑगस्टपासून अतिरिक्त आठ एसी गाड्या सुरू करणार

सध्या पश्चिम रेल्वे आठवड्याच्या दिवशी 40 आणि रविवारी 32 सेवा चालवते.

पश्चिम रेल्वे ८ ऑगस्टपासून अतिरिक्त आठ एसी गाड्या सुरू करणार
SHARES

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी आठ अतिरिक्त वातानुकूलित (एसी) लोकल फेऱ्या लवकरच सुरू होणार आहेत. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत या लोकल धावणार आहेत.

चर्चगेट-विरार, विरार-चर्चगेट, चर्चगेट-बोरिवली, बोरिवली-चर्चगेट, चर्चगेट-मालाड, मालाड-चर्चगेट, चर्चगेट-भाईंदर आणि भाईंदर-चर्चगेट या मार्गांवर अतिरिक्त वातानुकूलित लोकल फेऱ्या धावणार आहेत. सध्या पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या रविवारी ३२ फेऱ्या आणि अन्य दिवशी ४० फेऱ्या धावतात.

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांकडून एसी लोकलची मागणी वाढल्याने फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात पाचवी वातानुकूलित लोकल दाखल झाली आहे. यामुळे येत्या काही दिवसांत वातानुकूलित लोकलच्या आठ फेऱ्या वाढवण्यात येतील. या फेऱ्यांचे वेळापत्रक तयार झाले असून येत्या काही दिवसांत यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

एप्रिल महिन्यात २२ हजार प्रवाशांच्या तुलनेत जुलै महिन्यात ४६,८०० अशी प्रवासी संख्या वातानुकूलित लोकलला लाभली. एप्रिल महिन्यात प्रति लोकल १,१०२ आणि जुलै महिन्यात प्रति लोकल १,५१५ इतके प्रवासी लाभले.

वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५० टक्क्यांनी कपात केल्यामुळे रेल्वे प्रवाशांचा कल या लोकलकडे वाढला आहे. सध्या धावणाऱ्या वातानुकूलित फेऱ्यांना प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.



हेही वाचा

बेस्टच्या आगारांमध्ये वाहन उभे करण्यासाठी जागा आरक्षित करता येणार

विरार ते मीरा रोड मार्गावर मेट्रोची गरज, राजेंद्र गावितांची लोकसभेत मागणी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा