Advertisement

बेस्टच्या आगारांमध्ये वाहन उभे करण्यासाठी जागा आरक्षित करता येणार

मुंबईत आता वाहन उभे करण्यासाठी मोबाईल ऍपच्या माध्यमातून जागा आरक्षित करता येणार आहे.

बेस्टच्या आगारांमध्ये वाहन उभे करण्यासाठी जागा आरक्षित करता येणार
SHARES

मुंबईत आता वाहन उभे करण्यासाठी मोबाईल ऍपच्या माध्यमातून जागा आरक्षित करता येणार आहे. मुंबईतील वाहनतळांची कमतरता हेरून बेस्टने वॅले पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आखली. ७ ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. यातून बेस्टलाही उत्पन्नाचे साधन मिळणार आहे.

बेस्टने आगार आणि बस स्थानकांमध्ये रिकाम्या जागी खासगी वाहनांसाठी शुल्क तळ उभे केले आहेत. मुंबईत बेस्टची २७ आगारे असून या सर्व आगारात वाहनतळ आहेत. यामध्ये आगार किंवा बस स्थानकात येऊन शुल्क भरून वाहन उभे करता येते.

सध्या सर्व आगारात मिळून सरासरी २०० पेक्षा अधिक वाहने उभी राहू शकतात. मात्र काहीवेळा वाहने उभी करतानाही जागा उपलब्ध नसल्याने वाहन चालकांना पुन्हा परतावे लागते. यावर तोडगा म्हणून आता वाहने उभी करण्यासाठी जागा आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मोबाईल ऍपच्या माध्यमातून वॅले पार्किंग सुरू करण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे, अशी माहीती बेस्ट उपक्रमाने दिली.

‘पार्क + ‘ऍपवर आगार आणि बस स्थानकातील वाहनतळांवर उपलब्ध असलेल्या जागेबाबतची माहिती सहज उपलब्ध होईल. त्यामुळे वाहन चालक त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी वाहन उभे करण्यासाठी जागा आरक्षित करू शकतील.

तसेच डिजिटल माध्यमातून वाहन शुल्कही भरू शकतील. सुरुवातीला कुलाबा, मुंबई सेंट्रल, वरळी, दिंडोशी, वांद्रे येथे ही सुविधा मिळू शकेल. त्यासाठी दोन तासांकरिता कोणत्याही प्रकारच्या वाहनांसाठी १०० रुपये आणि दोन तासांनंतर प्रत्येक तासासाठी ३० रुपये आकारण्यात येतील.

सध्या चालकांनी स्वतः जागा शोधून वाहन उभे केल्यास सहा तासांसाठी २५ रुपये, बारा तासांसाठी ३० रुपये आणि तीन चाकी तसेच चार चाकी वाहनांसाठी १२ तासांसाठी ७० रुपये शुल्क घेण्यात येते.



हेही वाचा

विरार ते मीरा रोड मार्गावर मेट्रोची गरज, राजेंद्र गावितांची लोकसभेत मागणी

पालिकेच्या मदतीनं मध्य रेल्वे बांधणार १० नवे फुट-ओवर ब्रिज

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा