कचरा वेगळा करणाऱ्या हाउसिंग सोसायट्यांना पालिकेकडून मालमत्ता करावर १५ टक्के सूट

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील हाउसिंग सोसायट्यांसाठी महापालिकेनं खुशखबर दिली आहे. महापालिकेनं आपल्या परिसरातील कचरा वेगळा करणाऱ्या आणि डीकंपोज करणाऱ्या हाउसिंग सोसायट्यांना मालमत्ता करावर १५ टक्के सूट देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार, एखाद्या हाउसिंग सोसायटीनं कचरा वेगळा आणि डीकंपोज केल्यास त्यांना मालमत्ता करावर १५ टक्के सूट मिळणार आहे.

प्रस्तावास मंजूरी

महापालिकेच्या स्थायी समितीनं हा प्रस्ताव मंजूर केला आहे. या प्रस्तावानुसार, हाउसिंग सोसयटीनं परिसरातील कचरा वेगळा आणि डीकंपोज केल्यास मालमत्ता करावर ५ टक्के सूट मिळणार आहे. तसंच, एकत्र केलेल्या कचऱ्याचा पुर्नवापर केल्यास आणखी ५ टक्के सूट मिळणार आहे. त्याशिवाय, सोसायटीनं सांडपाणी आणि पावसाचं पाणी पुन्हा वापरण्याची यंत्रणा स्थापित केल्यास, त्यावर ५ टक्के सूट देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या या निर्णयानंतर याबाबत युवासेना प्रमुख आदित्या ठाकरे यांनी ट्विट केलं आहे. 'महापालिकेच्या या निर्णयामुळं मुंबईकरांतील कचरा व्यवस्थापनास चालना मिळेल’, असं लिहिलं आहे.


हेही वाचा -

बेस्टनं फेडलं ५३१ कोटी रुपयांचं कर्ज

आरोही पंडित ठरली २ महासागर पार करणारी पहिली महिला


पुढील बातमी
इतर बातम्या