Advertisement

बेस्टनं फेडलं ५३१ कोटी रुपयांचं कर्ज

बेस्ट उपक्रमनानं महापालिकेकडून देण्यात आलेल्या रकमेतून आतापर्यंत ५३१ कोटी रुपये एवढ्या कर्जाची परतफेड केली आहे.

बेस्टनं  फेडलं ५३१ कोटी रुपयांचं कर्ज
SHARES

मागील अनेक महिने आर्थित तोटा सहन करणाऱ्या बेस्ट उपक्रम आता आर्थिक समस्यांमधून सुटका होत असल्याचं पाहायला मिळतं. नुकताच बेस्ट उपक्रमनानं महापालिकेकडून देण्यात आलेल्या रकमेतून आतापर्यंत ५३१ कोटी रुपये एवढ्या कर्जाची परतफेड केली आहे

५३१.५५ कोटी रुपये

बेस्ट उपक्रमावर असणाऱ्या कर्जाच्या परतफेडीकरिता मुंबई महानगरपालिकेकडून १ हजार १३६.३१ कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. मंजूर रकमेपैकी आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेनं ६६५.३१ कोटी रुपये बेस्ट उपक्रमाला दिले आहेत. त्यामधून आजपर्यंत ५३१.५५ कोटी रुपये एवढ्या कर्जाची त्वरित परतफेड करण्यात आली आहे.

कर्जाचा भार कमी

यामुळं बेस्ट उपक्रमावरील कर्जाचा भार ५३१.५५ कोटी रुपयांनी कमी झाला आहे. बेस्ट उपक्रमाला कर्जावरील व्याजापोटी द्याव्या लागणाऱ्या वार्षिक ५२.६३ कोटी रुपये रकमेची बचत झाली आहे.



हेही वाचा -

साडे आठ तासानंतर राज ठाकरे ईडीच्या कार्यालयाबाहेर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा