Lockdown संदर्भातील केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी, जाणून घ्या नवीन नियम

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला. यापूर्वी १४ एपरिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. आता लॉकडाऊनची तारीख वाढवण्यात आली. पंतप्रधान म्हणाले की, कोरोनायरसचा प्रसार आणखी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी हे आवश्यक होतं.

पण आता केंद्र सरकारनं देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यानुसार २० एप्रिलनंतर काही भागांमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात येईल. पण या यादीमध्ये हॉटस्पॉट्स असलेल्या जागा नाहीत.

काय सुरू नसेल?

  • लॉकडाऊन 2.0 दरम्यान नॉन-ऑपरेशनल म्हणजेच सिनेमा हॉल, मॉल्स, शॉपिंग मार्केट, जिम, क्रीडा संकुल, जलतरण तलाव, बार हे ३ मेपर्यंत बंद राहतील.
  • याशिवाय सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, धार्मिक कार्ये, धार्मिक स्थळे देखील ३ मे पर्यंत बंद राहतील.
  • मेट्रो, बस सेवा, शैक्षणिक संस्था, कोचिंग सेंटर, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, रेल्वे सेवा ३ मे पर्यंत स्थगित राहतील.
  • देशभरातील दुकानांमध्ये गर्दी जमा होऊ नये म्हणून दारू, गुटखा, तंबाखू इत्यादींच्या विक्रीवर बंदी असेल.
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा गुन्हा मानला जाईल आणि त्याविरोधात कडक कारवाई केली जाईल.

काय सुरू राहणार?

  • किराणा दुकाने, दूध, कुक्कुटपालन, मासे, मांस इत्यादी सर्व लॉकडाऊनमध्ये उपलब्ध राहतील.
  • अत्यावश्यक वस्तू घेऊन येणार्‍या ई-कॉमर्स वाहनांना हॉटस्पॉट किंवा रेड झोन क्षेत्रात परवानगी दिली जाईल.
  • ट्रक दुरुस्तीची दुकाने, शासकीय कामकाजासाठी कॉल सेंटर, कृषी यंत्रसामग्रीची दुकानं, त्याचे सुटे भाग विकणारी दुकानं, वितरण, शेती यंत्रणेशी संबंधित कस्टम हायरिंग सेंटर २० एप्रिलपासून खुले असतील.
  • २० एप्रिलपासून शेती, बागायती उपक्रम, कृषी उत्पादनं तसंच मंडई यांना परवानगी देण्यात येणार आहे.
  • याव्यतिरिक्त, औषधे, वैद्यकीय उपकरणे, रुग्णवाहिकांच्या उत्पादनासह वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या बांधकामांना परवानगी दिली जाईल.
  • २० एप्रिलपासून ग्रामीण भागातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या मजूरांना जाण्या-येण्याची परवानगी देण्यात आली आहे.
  • सिंचन प्रकल्प किंवा नूतनीकरण योग्य उर्जाशी जोडलेल्या ग्रामीण भागात बांधकाम उपक्रमांना सूट देण्यात आली आहे. मजुरीची उपलब्धता असल्यास स्थानिक प्रशासनाच्या परवानगीनं मुख्य भागात बांधकामांना परवानगी आहे.

हॉटस्पॉट असलेल्या भागांचं काय?

महाराष्ट्र सरकारने मंगळवारी असं नमूद केलं की, उद्योग क्षेत्राला काही प्रमाणात कार्य करण्याची परवानगी देऊन ते हळूहळू अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करतील. तर जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धताही सुरळीत होईल. विशेषत: अशा जिल्ह्यांमध्ये जिथे कोविड १९ चे अत्यल्प पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

तर मुंबईतील काही भाग हे coronavirus चे हॉटस्पॉट मानले जात आहेत. हॉटस्पॉट आणि सील केलेल्या भागांसाठी नवीन नियमावली असेल. ही नियमावली २० एप्रिलनंतर जारी करण्यात येणार आहे.


हेही वाचा

लॉकडाऊनमध्येही Amazon, Flipkart चा आसरा, 'यातारखेपासून होणार सुरू

पुढील बातमी
इतर बातम्या