Advertisement

लॉकडाऊनमध्येही Amazon, Flipkart चा आसरा, 'या' तारखेपासून होणार सुरू

इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा म्हणजेच Amazon, Flipkart माध्यमातून ऑनलाईन वस्तुंची खरेदी करता येऊ शकते. याशिवाय काय बंद आणि काय चालू हे देखील जाणून घ्या.

लॉकडाऊनमध्येही Amazon, Flipkart चा आसरा, 'या' तारखेपासून होणार सुरू
SHARES

कोरोनाव्हायरसमुळे जेशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. ३ मे पर्यंत आता लॉकडाऊन वाढवण्यात देखील आलाय. त्यामुळे आता सरकारच्या वतीनं नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकांना लवकरच इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा म्हणजेच  Amazon, Flipkart माध्यमातून ऑनलाईन वस्तुंची खरेदी करता येऊ शकते.

नवीन नियमावलीमध्ये असे म्हटले आहे की सर्व उपक्रम राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या परवानगीनंतर २० एप्रिलपासून लागू केले जातील.


कुरिअर सर्व्हिसलाही परवानगी

नवीन नियमावलीत असं सांगितलं गेलं आहे की, मर्यादित नियंत्रण क्षेत्र, हॉटस्पॉट्स आणि रेड झोन वगळता सर्वत्र मालाची वाहतूक करण्याची परवानगी दिली जाईल. यामध्ये वस्तू आणि पार्सलच्या वाहतुकीसाठी रेल्वेचे कामकाज, वाहतुकीसाठी विमानतळ आणि मालवाहतुकीसाठी लँड बंदरांच्या कामकाजाचा समावेश आहे. त्यामध्ये ट्रक आणि ई-कॉमर्स वाहनांचाही समावेश आहे.

या नियमावलीत अत्यावश्यक वस्तू घेऊन येणार्‍या ई-कॉमर्स वाहनांना हॉटस्पॉट किंवा रेड झोन क्षेत्रात परवानगी दिली जाईल. याशिवाय कुरिअर सर्व्हिस वाहनांनाही परवानगी देण्यात येणार आहे.


सामाजिक अंतराचे पालन

सरकारनं सांगितलं की, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा स्थानिक दुकाने, किरकोळ, मोर्टार स्टोअर किंवा ई-कॉमर्स कंपन्यांमार्फत असतील. तर त्या वितरित करण्यास परवानगी देण्यात येईल. यासाठी त्यांना सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. अशी अपेक्षा आहे की नवीन मार्गदर्शक तत्त्वांसह शॉपिंग वेबसाइट्स आणि ई-कॉमर्स वेबसाइट ऑर्डर घेण्यास आणि ग्राहकांना वितरीत करण्यास सक्षम असतील.

या सेवांना सवलती

  • रुग्णालये
  • किराणा दुकानं
  • शेती
  • ऑनलाईन टीचिंग
  • मासेमारी

या सर्व सवलती ग्रामीण भागांत आणि हॉटस्पॉट्स नसलेल्या क्षेत्रांसाठी असतील. या सूचनांमध्ये ग्रामीण भागातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या मजूरांना जाण्या-येण्याची परवानगी देण्यात आली आहे. सिंचन प्रकल्प किंवा नूतनीकरण योग्य उर्जाशी जोडलेल्या ग्रामीण भागात बांधकाम उपक्रमांना सूट देण्यात आली आहे. मजुरीची उपलब्धता असल्यास स्थानिक प्रशासनाच्या परवानगीनं मुख्य भागात बांधकामांना परवानगी आहे.


या सेवा बंद

  • हवाई सेवा
  • रेल्वे सेवा
  • टॅक्सी
  • मेट्रो
  • मॉल्स
  • जीम
  • जलतरण तलाव
  • बार
  • हॉटेल्स
हॉटस्पॉट आणि सील केलेल्या भागांसाठी नवीन नियमावली असेल. ही नियमावली 20 एप्रिलनंतर जारी करण्यात येणार आहे.



हेही वाचा

भाज्यांसाठी घराबाहेर पडणाऱ्यांसाठी पालिकेची अनोखी शक्क्ल

Coronavirus Update: मुंबईत १७५६ कोरोना रुग्ण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा